VIDEO : या व्यक्तीने जुगाड करून Swift कारची बनवली बैलगाडी, IAS म्हणाले - 'वाह काय थाट आहे'
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2021 01:17 PM2021-02-05T13:17:52+5:302021-02-05T13:20:34+5:30
व्हिडीओत बघितलं जाऊ शकतं. की, दोन व्यक्ती कारच्या मागच्या भागात बसलेले आहेत. बघताना असं वाटतं की, ते स्वीफ्ट कारमध्ये बसत आहेत.
IAS अधिकारी अवनीष शरण यांनी आणखी एका जुगाडाचा व्हिडीओ शेअर केला आहे. जो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एका व्यक्तीने जुगाड करून अनोखी बैलगाडी तयार केली आहे. त्याने बसण्याच्या जागेवर स्वीफ्ट कारचा मागचा भाग जोडला आहे. पहिल्यांदा पाहताना तुम्हाला वाटेल की, स्वीफ्ट कार आहे. पण जेव्हा पूर्ण कार बघाल तेव्हा तुम्ही चकित व्हाल.
व्हिडीओत बघितलं जाऊ शकतं. की, दोन व्यक्ती कारच्या मागच्या भागात बसलेले आहेत. बघताना असं वाटतं की, ते स्वीफ्ट कारमध्ये बसत आहेत. पण जसाही कॅमेरा ड्रायव्हर सीटकडे फिरवला जातो तेव्हा सगळेच थक्क होतात. समोर बैलगाडी दिसते. एका व्यक्तीने जुगाड करून स्वीफ्ट कारची बैलगाडी तयार केली आहे. ड्रायव्हर समोर बसून बैलगाडी चालवत होता.
ठाठ.🤩😎 pic.twitter.com/j3FSd5XZWz
— Awanish Sharan (@AwanishSharan) February 4, 2021
Environment friendly, I would rather say!
— Jayant kumar (@k_jayantsharma) February 4, 2021
Kaha se aapko milta hai ye sab video Sir 🤩
— Ankit (@Mr_Ankit255) February 4, 2021
"कबाड़ से जुगाड."...!👌
— Sanjay Kumar, Dy. Collector (@dc_sanjay_jas) February 5, 2021
New 3R
Re-think, Re-use, Re-cycle
3 in 1...
— Rising Rashmi Singh (@risingrashmi19) February 4, 2021
Ancient,medieval nd modern technology 😀😀🤗
हा व्हिडीओ त्यांना ४ फेब्रुवारीच्या रात्री शेअर केला होता. आतापर्यंत या व्हिडीओला २६ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. सोबतच २ हजारांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. आणि २०० पेक्षा जास्त रिट्विट मिळाले आहेत. लोक यावर भरभरून कमेंट्सही करत आहेत.