विमानाचं तिकिट 13,820 रूपये... बुकिंग कॅन्सल केल्यावर मिळाले फक्त ₹ 20, असं का घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2023 09:22 AM2023-07-12T09:22:41+5:302023-07-12T09:23:20+5:30
'इतक्या पैशांचं मी काय करू, मला कोणीतरी गुंतवणुकीचा प्लॅन सांगा', प्रवाशाची उपहासात्मक कमेंट
Flight Ticket Cancellation: जेव्हा लोक विमानाचे तिकीट बूक करून कॅन्सल करतात, तेव्हा ते रद्द करण्याचा प्रचंड खर्च आणि नगण्य परतावा यामुळे अनेकदा निराश होतात. बिहार केडरचे आयएएस अधिकारी राहुल कुमार यांनाही विमानाचे तिकीट रद्द करताना अशाच समस्येचा सामना करावा लागला. फ्लाइट तिकीट रद्द केल्यानंतर मिळालेल्या रिफंडचा स्क्रीनशॉट शेअर करत राहुल कुमार यांनी उपहासाने लिहिले, "कृपया मला परताव्यासाठी काही चांगल्या गुंतवणूक योजना सुचवा." आयएएस अधिकाऱ्याला 13,820 रुपयांना बुक केलेल्या फ्लाइट तिकिटावर केवळ दोन आकडी किंमत परत मिळाली. वाचा नक्की काय घडलं...
IAS अधिकाऱ्याने स्क्रीनशॉट केला शेअर
IAS अधिकाऱ्याने शेअर केलेला स्क्रीनशॉट दाखवतो की त्याने 1,138 रुपयांची सूट मिळाल्यानंतर त्याने रक्कम भरली आणि तिकीट बूक केले. एअरलाइन बूकिंग रद्द करण्याचे शुल्क 11,800 रुपये, GI रद्द करण्याचे शुल्क रुपये 1,200 आणि सुविधा शुल्क रुपये 800 होते. त्याची एकूण कॅन्सलेशन फी 13,800 रुपये असल्याने त्याला परतावा म्हणून केवळ 20 रुपये परत मिळाले. मंगळवारी शेअर करण्यात आलेल्या या ट्विटला आतापर्यंत 1,100 हून अधिक लाईक्स मिळाले असून नेटिझन्स यावर व्यक्त होत आहेत. IFS अधिकारी प्रवीण कासवान यांनी लिहिले आहे, "एवढी मोठी रक्कम परतावा म्हणून मिळाल्याने तुम्हाला तर अतिरिक्त सुरक्षा आवश्यक असेल."
Pls suggest some good investment plans for my refund. pic.twitter.com/lcUEMVQBnq
— Rahul Kumar (@Rahulkumar_IAS) July 10, 2023
स्क्रीनशॉट व्हायरल झाल्यानंतर, एका वापरकर्त्याने लिहिले, "हे चॅरिटीला दान करा आणि कर परतावा दावा करा!" एका वापरकर्त्याने सुचवले, “मी या प्रकरणांमध्ये परताव्याची प्रक्रिया करत नाही. विमान कंपनी दुसर्या प्रवाशाला पुन्हा विकण्यापेक्षा सीट वाया जाऊ द्या." आणखी एका व्यक्तीने लिहिले की, "मला गणितात फारसा चांगला नाही पण उरलेल्या मोठ्या रकमेसाठी मी तुम्हाला गुंतवणुकीच्या योजना सुचवू शकतो. एखाद्या गरजू व्यक्तीला दान करा म्हणजे त्यांचा आशीर्वाद नक्कीच कोणत्याही गुंतवणुकीपेक्षा जास्त असेल." आणखीही बऱ्याच कमेंट्स यावर आल्या आहेत.