विद्यार्थ्यांसोबत डान्स करताना दिसल्या आयएएस ऑफिसर, लोकांनी केला कौतुकाचा वर्षाव

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2022 06:28 PM2022-04-05T18:28:56+5:302022-04-05T18:30:02+5:30

केरळच्या (Kerala) पथनमतित्ता (Pathanamthitta) जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी डॉ. दिव्या एस. अय्यर (IAS Divya S Iyer) यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसोबत नृत्य केले. त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

ias officer dirvya s iyer dancing with student video goes viral on internet | विद्यार्थ्यांसोबत डान्स करताना दिसल्या आयएएस ऑफिसर, लोकांनी केला कौतुकाचा वर्षाव

विद्यार्थ्यांसोबत डान्स करताना दिसल्या आयएएस ऑफिसर, लोकांनी केला कौतुकाचा वर्षाव

Next

आयएएस-आयपीएस अधिकाऱ्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. आता आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये केरळच्या (Kerala) पथनमतित्ता (Pathanamthitta) जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी डॉ. दिव्या एस. अय्यर (IAS Divya S Iyer) यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसोबत नृत्य केले. त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यांनी विद्यापीठाच्या फ्लॅश मॉबमध्ये भाग घेतला होता. तिथे विद्यार्थ्यांनी डान्स सुरू करताच डॉ. दिव्या यांनीही डान्स सुरू केला. त्यांचा धमाकेदार डान्स पाहून सगळेच थक्क झाले.

हा व्हिडिओ एमजी विद्यापीठाचा आहे. या व्हिडिओमध्ये डॉ. दिव्या ‘नगाड़ा संग ढोल..’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. त्याच्यासोबत विद्यार्थीही नाचत आहेत. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर त्यांनी सांगितले, की इथे डान्स करून कॉलेजचा युवा महोत्सव आठवला.

आयएएस दिव्या म्हणाल्या, की जेव्हा त्या डान्स करत होत्या, तेव्हा त्यांची मुले आणि पतीही तिथे उपस्थित होते. त्यांनाही हा डान्स खूप आवडला. अनिरुद्धही एक विद्यार्थी आहे, तोही या फ्लॅश मॉबमध्ये सहभागी झाला होता. तो सांगतो, की जेव्हा डॉ. दिव्या यांनी त्यांच्यासोबत आणि त्यांच्या ग्रुपसोबत डान्स केला, तेव्हा प्रत्येकजण खूप प्रेरित झाला होता.

स्थानिक बातम्यांनुसार, अय्यर ‘दीपकळ्ळा’ या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी कार्यक्रमस्थळी उपस्थित होत्या. तिथे विद्यार्थ्यांनी वारंवार विनंती केल्यानंतर त्या नृत्यात सामील झाल्या. सोशल मीडियावर हा व्हिडिओ पाहिल्यानंतरही लोक त्यांचे चाहते झाले आणि त्यांनी आयएएस दिव्या यांच्या या साधेपणाचे कौतुकही केले.

Web Title: ias officer dirvya s iyer dancing with student video goes viral on internet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.