"जगात याहून मोठं काहीच नाही", IAS अधिकाऱ्यानं शेअर केला 'आईची माया' दाखवणारा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2022 07:19 PM2022-03-21T19:19:10+5:302022-03-21T19:21:31+5:30
सोशल मीडियावर दररोज कोणता ना कोणता व्हिडिओ आणि फोटो चर्चेचा विषय ठरत असतो. पण जेव्हा-जेव्हा आईशी संबंधित काहीतरी समोर येतं ते नेहमीच सर्वांच्या हृदयाला स्पर्श करतं.
सोशल मीडियावर दररोज कोणता ना कोणता व्हिडिओ आणि फोटो चर्चेचा विषय ठरत असतो. पण जेव्हा-जेव्हा आईशी संबंधित काहीतरी समोर येतं ते नेहमीच सर्वांच्या हृदयाला स्पर्श करतं. सध्या असाच एक फोटो लोकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. हा फोटो पाहिल्यानंतर तुम्ही नक्कीच आईला मिठी माराल. जगात आईच्या कुशी व्यक्तीरिक्त इतर कोणतीही मोठी गोष्ट नाही. आईची सावली अन् कुशी ही जगातील सर्वात सुरक्षित जागा आहे, असं म्हणतात. ज्याच्या डोक्यावर आईची माया असते त्याचं कधीच कुणी वाईट करू शकत नाही. आता व्हायरल होत असलेला हा फोटो पाहा, जिथं एका आईची मुलं कडाक्याच्या उन्हात फिरत आहेत. आपल्या लेकरांना उन्हाचा तडाखा बसू नये यासाठी आईनं आपल्या साडीच्या पदाराखाली लेकरांना घेतलं आहे.
माँ के कोमल आँचल से बड़ी छाया और कही नहीं 🙏🏻 💕 pic.twitter.com/V5g8GnbRhP
— Sonal Goel IAS (@sonalgoelias) March 20, 2022
व्हायरल होत असलेला हा फोटो भारतीय प्रशासकीय सेवेत (IAS) अधिकारी असलेल्या सोनल गोयल यांनी शेअर केला आहे. 'मां के कोमल आँचल से बड़ी छाया और कही नहीं', असं कॅप्शन फोटोला दिलं आहे. या फोटोला 14 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. सोबतच लोक यावर आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत. हा फोटो सोशल मीडियावर लोकांना चांगलाच आवडला आहे.
मां के लिए कोई शब्द ही नहीं जिसमें मां को बयां किया जा सके❤️
— Satyanshu Singh Rajput (@Satyanshu0734) March 21, 2022
एका यूजरनं, 'आईचा पदर तर सावली देतच पण आईची सावलीही मुलांच्या पाठिशी उभी असते', असं म्हटलं आहे. तर दुसऱ्या यूजरनं लिहिलं की, 'या जगात खरंच आईपेक्षा मोठं कोणी नाही.' तर एकानं 'यासाठी शब्दच नाही. आईचं वर्णन शब्दात केलं जाऊ शकत नाही'. याशिवाय इतर अनेक युजर्शनं यावर त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
माँ का आँचल शीतल छाया हैं।
— 💗Prakash Waghela~~~ (@Prakash03307230) March 20, 2022
माँ वंदनीय हैं, पूजनीय हैं। 🙏
आँचल तो छाया देती ही है, पर माँ की परछाई भी छाया का काम करती है..
— Aakash Tiwari (@aakashtiwari_22) March 20, 2022