वृद्ध व्यक्तीला रस्त्याच्या कडेला बसलेलं पाहून मराठमोळा IAS अधिकारीही कारमधून उतरला अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2021 07:40 PM2021-10-19T19:40:04+5:302021-10-19T19:41:43+5:30
एका आयएएस अधिकाऱ्याला रस्त्याच्या कडेला बसून वृद्ध व्यक्तीसोबत गप्पा मारताना तुम्ही कधी पाहिलंय का? कदाचित याच लक्षवेधी कृतीनं मराठमोळ्या रमेश घोलप या IAS अधिकाऱ्यानं सर्वांचं मन जिंकलं आहे.
एका आयएएस अधिकाऱ्याला रस्त्याच्या कडेला बसून वृद्ध व्यक्तीसोबत गप्पा मारताना तुम्ही कधी पाहिलंय का? कदाचित याच लक्षवेधी कृतीनं मराठमोळ्या रमेश घोलप या IAS अधिकाऱ्यानं सर्वांचं मन जिंकलं आहे. IAS अधिकारी रमेश घोलप यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर काही फोटो ट्विट केले आहेत. यात ते आपल्या इनोव्हा कारमधून खाली उतरुन थेट रस्त्यावर एका वृद्ध व्यक्तीसोबत गप्पा मारताना दिसत आहेत. तर घोलप यांचे सुरक्षा रक्षक मात्र कारमध्येच बसून आहेत. आयएएस अधिकाऱ्यानं ट्विट केलेले हे फोटो सोशल मीडियात तुफान व्हायरल झाले आहेत.
एका वृद्ध व्यक्तीची विचारपूस करतानाचे फोटो रमेश घोलप यांनी ट्विट केले आहेत. ते ट्विट करताना घोलप यांनी "तज़ुर्बा है मेरा मिट्टी की पकड़ मजबूत होती है, संगमरमर पर तो हमने पांव फिसलते देखे हैं|", अशी शायरी ट्विट केली आहे. घोलप यांच्या ट्विटला अडीच हजारांहून अधिक लाइक्स आणि १७० हून अधिक जणांनी रिट्विट केलं आहे. अनेकांनी घोलप यांचं कौतुकही केलं आहे.
"तज़ुर्बा है मेरा मिट्टी की पकड़ मजबुत होती है,
— Ramesh Gholap IAS (@RmeshSpeaks) October 18, 2021
संगमरमर पर तो हमने पाँव फिसलते देखे हैं।"#माझी_गावाकडची_माणसं#बप्पा#मेरा_गांव#जन्मभूमीpic.twitter.com/zuOxLEICSO
रमेश घोलप मूळचे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तहसीलमधील महागांवचे रहिवासी आहेत. त्यांच्या वडिलांचं सायकलचं दुकान आहे. आर्थिक परिस्थिती हलाकीची होती. कठोर परिश्रम आणि अथक प्रयत्नांनंतर २०१० साली यूपीएससीची परीक्षा त्यांनी दिली होती. पण त्यात अपयश हाती आलं होतं. पण २०११ साली त्यांनी पुन्हा एकदा त्याच जोशात तयारी केली आणि परीक्षा दिली. यावेळी संपूर्ण देशात २८७ रँकसह ते यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण झाले आणि आयएएस अधिकारी बनले.