सोसायटीच्या लिफ्टबाहेर चिकटवलेली नोटीस पाहून लोक संतापले, IAS अधिकाऱ्याने शेअर करत लिहिले...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2022 07:02 PM2022-11-23T19:02:22+5:302022-11-23T19:05:43+5:30

तुम्ही मोठ-मोठ्या इमारतीबाहेर अनेक नोटीस लावलेल्या पाहिल्या असतील. काही नोटीस या हास्यास्पद असतात. तर काही गंभीरही असतात.

ias shared classist building notice twitter react photogoes viral | सोसायटीच्या लिफ्टबाहेर चिकटवलेली नोटीस पाहून लोक संतापले, IAS अधिकाऱ्याने शेअर करत लिहिले...

सोसायटीच्या लिफ्टबाहेर चिकटवलेली नोटीस पाहून लोक संतापले, IAS अधिकाऱ्याने शेअर करत लिहिले...

Next

तुम्ही मोठ-मोठ्या इमारतीबाहेर अनेक नोटीस लावलेल्या पाहिल्या असतील. काही नोटीस या हास्यास्पद असतात. तर काही गंभीरही असतात. सध्या अशीच एक नोटीस सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या नोटीसमध्ये इमारतीची लिफ्ट वापरण्यावरुन नियम लिहिले आहेत. हे नियम वाचून अनेकांनी निषेध व्यक्त केला आहे. एका आयएएस अधिकाऱ्याने ही नोटीस शेअर केली आहे. यावर अनेकांनी कमेंट करुन निषेध व्यक्त केला आहे. 

इमारतींमध्ये डिलिव्हरीसाठी अनेकजण येत असतात. त्यांना इमारतीमध्ये येण्यासाठी परवानगीही असते, पण सध्या एका इमारतीवरील नोटीस व्हायरल झाली आहे. 

आईने दादाला मारलेलं पाहताच धावली चिमुकली आणि रागवत आईलाच म्हणाली... पाहा क्यूट व्हिडिओ

IAS अधिकारी अवनीश शरण यांनी मंगळवारी, 22 नोव्हेंबर रोजी ट्विटरवर हा फोटो शेअर केला आहे.  या ट्विटला 16 हजार लाइक्स, 1 हजाराहून अधिक रिट्विट्स आणि शेकडो प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. सोसायटी सदस्यांच्या या विचारसरणीवर सर्व वापरकर्ते टीका करत आहेत. एका युजरने लिहिले की, डिलिव्हरी करणाऱ्यांनी या नोटीसमध्ये तेच ठेवले तर बरे होईल. दुसर्‍याने लिहिले - डिलिव्हरी भागीदारांनी अशा अपार्टमेंटमध्ये वस्तू वितरित करणे थांबवावे. तिसर्‍याने लिहिले - हे खूप लज्जास्पद आहे. याशिवाय, अनेक वापरकर्त्यांनी सांगितले की आपण २१व्या शतकात जगत आहोत... यावर विश्वास बसत नाही!

ही सोसायटी नोटीस लिफ्टच्या बाहेर चिकटवण्यात आली आहे, ज्यावर लिहिले आहे – इमारतीतील रहिवाशांशिवाय कुणीही लिफ्ट वापरू नये… जसे स्विगी, झोमॅटो, वस्तू पोहोचवणारे लोकांनी वापरु नये असं यात लिहिले आहे. अशा प्रकारची नोटीस व्हायरल होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही अशा प्रकारच्या नोटिसा समोर आल्या आहेत, ज्यात घरांमध्ये काम करणाऱ्या नोकरदारांवर लिफ्ट वापरण्यावर बंदी घालण्यात आली आहे, वृत्तपत्रे टाकणारे  आणि सर्व प्रकारचे डिलिव्हरी करणारे लोक. अशा लोकांनी फक्त पायऱ्यांचा वापर करावा, असेही काहींनी लिहिले होते. 

Web Title: ias shared classist building notice twitter react photogoes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.