Viral Video: व्हिडिओ पाहून उत्तर द्या कसं गायब झालं ९ पैकी १ झाकण? ९९ टक्के लोकांनी दिलं चुकीचं उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2022 05:23 PM2022-02-23T17:23:30+5:302022-02-23T17:27:09+5:30
एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात एक गणितीय कोडं नेटिझन्सना दिलं गेलं आहे. हे कोडं सोडवताना ९९ टक्के नेटिझन्सचं उत्तर चुकीचं येत आहे.
सध्या सोशल मीडियावर (Social Media) कोडं (Puzzle) किंवा अवघड प्रश्नांविषयीचे फोटोज आणि व्हिडिओज व्हायरल होताना दिसत आहेत. भास निर्माण करणारं चित्र, कोडं किंवा गणिताविषयीचे प्रश्न नेटिझन्सना विचारून कमेंटमध्ये उत्तर देण्यास सांगितलं जात आहे. यातले प्रश्न अवघड असल्यानं बहुतांश युझर्सचं उत्तर चुकत असल्याचं दिसून येतं.
काही व्यक्ती मुळातच अभ्यासात हुशार असतात. त्यामुळे कितीही अवघड प्रश्न असला तरी ते त्याचं अचूक उत्तर देतात. शिक्षकदेखील अशा विद्यार्थ्यांना अधिक प्रोत्साहन देताना दिसतात; मात्र प्रत्येक विद्यार्थ्याचं टॅलेंट (Talent) वेगवेगळं असतं. अनेकांना गणितीय आकडेमोड जमत नाही. त्यामुळे सोशल मीडियावरचे गणिताशी निगडित प्रश्न सोडवण्यासाठी अनेकांना बराच वेळ लागतो. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात एक गणितीय कोडं नेटिझन्सना दिलं गेलं आहे.
हे कोडं सोडवताना ९९ टक्के नेटिझन्सचं उत्तर चुकीचं येत आहे. अर्थात यामागे ऑप्टिकल इल्युजन नंबर्स (Optical Illusion Numbers) हे कारण आहे. यात एखादी वस्तू समोर असूनही ती दिसत नाही. तुमचे डोळे अनेकदा एखादी वस्तू सहज बघू शकत नाहीत, हे कारण त्यामागे असतं.
सध्या एक शॉर्ट व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल (Viral) होत आहे. हा व्हिडिओ काही सेकंदांचा असला तरी त्यातलं कोड सोडवण्यासाठी नेटिझन्स कित्येक तास मोबाइलवर घालवत आहेत. या व्हिडिओमधला एक प्रश्न नेटिझन्सना कोड्यात टाकत आहे. कोल्ड्रिंक (Cold Drink) पिणं सगळ्यांनाच आवडतं. कोल्ड्रिंकच्या बाटलीचं झाकण (Cap) लहान मुलं खेळण्यासाठी वापरतात. या झाकणाचा वापर व्हिडिओतल्या कोड्यामध्ये केला गेला आहे.
या व्हिडिओत सुरवातीला नऊ झाकणं मोजली जातात. परंतु, व्हिडिओतली व्यक्ती अतिशय बेमालूमपणे हातातली स्टिक (Stick) इकडून तिकडे हलवते आणि त्यानंतर केवळ आठ झाकणं असल्याचं दिसतं. नऊ झाकणं असताना आठच कशी दिसतात, हा प्रश्न नेटिझन्सना (Netizens) कोड्यात टाकतो. हा व्हिडिओ पाहिल्यानंतरही एक झाकण कुठे गायब झालं हे नेटिझन्सना समजू शकत नाही. त्यामुळे अनेक नेटिझन्स या (Mathematical) कोड्याचं चुकीचं उत्तर कमेंटमध्ये देत आहेत; मात्र त्यामागे सोपी पद्धत वापरली गेली आहे.
हा सगळा आभासी खेळ आहे. व्हिडिओतली व्यक्ती जेव्हा स्टिक इकडून तिकडं हलवते, तेव्हा मध्यभागी असलेल्या एका झाकणावर त्यातलं दुसरं एक झाकण ठेवलं जातं. त्यामुळे एक झाकण गायब झालं आहे, असं व्हिडिओ पाहणाऱ्या व्यक्तीला वाटतं. ही गोष्ट इतकी सफाईदारपणे केली गेली आहे, की एक झाकण कसं गायब झालं हे समजणं खूपच कठीण आहे. त्यामुळेच ९९ टक्के नेटिझन्सनी या कोड्याचं उत्तर चुकीचं दिलं आहे.