'प्रेम असेल तर...', व्हॅलेंटाईनदिनी Swiggy ने पूर्ण केली तरुणीची इच्छा; पाठवले खास गिफ्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2024 03:48 PM2024-02-15T15:48:57+5:302024-02-15T15:49:50+5:30
स्विगी आणि या तरुणीची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Swiggy Viral Post: काल(14 फेब्रुवारी) प्रेमाचा दिवस म्हणजेच, व्हॅलेंटाईन डे पार पडला. यानिमित्त झोमॅटो, स्विगीसह अनेक कंपन्यांनी कपल्ससाठी विविध ऑफर आणल्या होत्या. यातील बहुतांश कंपन्यांचे मोबाईल ॲप्स आहेत, ज्यात मोबाईल नोटिफिकेशनद्वारे या ऑफर्सची माहिती ग्राहकांना आली. या दरम्यान फूड डिलिव्हरी ॲप Swiggy शी संबंधित एका घटनेची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. स्विगीने आपल्या एका महिला ग्राहकाला चक्का सुंदर व्हॅलेंटाईन गिफ्ट पाठवले.
इतर ॲप्सप्रमाणे स्विगीनेदेखील सुष्मिता नावाच्या आपल्या ग्राहकाला व्हॅलेंटाईन डेनिमित्त ऑफरचे नोटिफिकेशन पाठवले. सुष्मिताने या नोटिफिकेशनचा स्क्रीनशॉट घेतला आणि तो ट्विटरवर शेअर करत लिहिले- 'माझ्याकडे कुणीच व्हॅलेंटाइन नाही, स्विगी...असे मेसेज का पाठवता?' या पोस्टमध्ये तिने स्विगीला टॅग केले.
यावर उत्तर देताना स्विगीने म्हटले- 'तुम्हाला हवे असेल तर आम्ही तुमचे व्हॅलेंटाइन बनू शकतो.' यावर सुष्मिताने लिहिले- 'प्रेम असेल तर चीज बर्स्ट पिझ्झा पाठवा.' यानंतर स्विगीने तरुणीला तिचा पत्ता विचारला.
आश्चर्याची बाब म्हणजे, कंपनीने खरंच सुष्मिताची इच्छा पूर्ण केली आणि तिच्या घरी एक हर्ट शेपवाला पिझ्झा पाठवला. सुष्मिताने तो फोटो शेअर केला आणि स्विगीचे आभार मानले. तिची पोस्ट व्हायरल झाल्यापासून लोक त्यावर खूप कमेंट करत आहेत.