वाघ तो वाघच! आपल्या हद्दीत बिबट्याला पाहून वाघाने झेप घेत केला हल्ला, IFS अधिकाऱ्याने व्हिडीओ केला शेअर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2023 01:34 PM2023-02-23T13:34:25+5:302023-02-23T13:36:15+5:30
जंगलात वाघ तो वाघच असतो. वाघ आपल्या हद्दीत कोणाला शिकारीसाठी फिरकू देत नाही. एका डरकाळीने तो समोरच्याला गारद करतो. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
जंगलात वाघ तो वाघच असतो. वाघ आपल्या हद्दीत कोणाला शिकारीसाठी फिरकू देत नाही. एका डरकाळीने तो समोरच्याला गारद करतो. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, एका आयएफएस अधिकाऱ्याने हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत एका बिबट्यावर वाघाने झेप घेत हल्ला केल्याचे दिसत आहे.
या व्हिडीओत वाघ आणि बिबट्या एकमेकांवर हल्ला करत नसल्याचे दिसत आहे. बिबट्याने जमिनीवर उडी घेतल्यानंतर वाघ लगेच झेप घेऊन बिबट्या जवळ जातो पण तो बिबट्यावर हल्ला करत नाही. बिबट्या जमिनीवर झोपतो तर वाघ त्याच्याभोवती फिरत असल्याचे दिसत आहे.
This face off between the tiger & leopard is bit unnatural.
— Susanta Nanda (@susantananda3) February 22, 2023
What do you think as to why both backed up without attacking each other. Peaceful coexistence? pic.twitter.com/O7yTkkFYil
हा व्हिडीओ 'भारतीय वन सेवा' अधिकारी सुशांत नंदा यांनी २२ फेब्रुवारी रोजी शेअर केला आहे. याला त्यांनी एक कॅप्शन दिली आहे, 'वाघ आणि बिबट्या समोरासमोर येणे थोडे अनैसर्गिक आहे', अशी कॅप्शन दिली आहे. या व्हिडीओला आतापर्यंत ३१ हजारांहून अधिक व्हूज लाईक्स आणि सातशेहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसेच या पोस्टला अनेकांनी कमेंटही केल्या आहेत. 'बिबट्याने पूर्णपणे आत्मसमर्पण केले, त्यामुळे वाघ मागे थांबला', अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे. तर दुसऱ्याने, 'फेब्रुवारीला प्रेमाचा महिना म्हणतात हे विनाकारण नाही, असं लिहिले आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
That is how leopard survives in a tiger dominated landscape😊
— Susanta Nanda (@susantananda3) February 14, 2023
Tigers can easily climb trees,with their sharp and retractable claws providing a powerful grip to hold the tree trunk and climb up. But as they grow old their body weight prevents them to do so.
Stay slim to survive🙏 pic.twitter.com/uePgSwIJcj
हा व्हिडीओ सुशांत नंदा यांनी १४ फेब्रुवारीला पोस्ट केला होता. त्यांनी कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले की, अशा प्रकारे वाघाचे वर्चस्व असलेल्या भागात बिबट्या जिवंत राहतो. वाघ सहजपणे झाडांवर चढू शकतात. त्यांचे मजबूत आणि तीक्ष्ण नखे त्यांना मजबूत पकड देतात त्यामुळे ते झाडाच्या खोडावर चढू शकतात. पण जसजसे त्यांचे वय वाढते तसतसे त्यांच्या शरीराचे वजन त्यांना तसे करण्यापासून रोखते, असंही त्या अधिकाऱ्यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे.