ह्दयस्पर्शी! मृत्यूपूर्वी पतीनं जी गोष्ट पत्नीला सांगितली ती ऐकून अनेकांचे डोळे पाणावले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2023 05:56 PM2023-01-24T17:56:17+5:302023-01-24T17:56:34+5:30

शिन जिंग जिया यांनी व्हिडिओ शेअर करताना लिहिलं की, अखेर आजोबा गेले, आजी लहान मुलीसारखी रडत होती.

‘I’m going now, don’t cry’: dying man’s last words to wife touch millions in China | ह्दयस्पर्शी! मृत्यूपूर्वी पतीनं जी गोष्ट पत्नीला सांगितली ती ऐकून अनेकांचे डोळे पाणावले

ह्दयस्पर्शी! मृत्यूपूर्वी पतीनं जी गोष्ट पत्नीला सांगितली ती ऐकून अनेकांचे डोळे पाणावले

Next

एका वृद्ध पतीने मृत्यूपूर्वी पत्नीला धीर देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी अशी गोष्ट सांगितली जी ऐकून कुणाच्याही डोळ्यात पाणी येईल. उत्तर चीनमधील ही घटना आहे. वृद्ध जोडप्याचा संवाद स्थानिक सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पती-पत्नी गेल्या ६४ वर्षापासून एकत्र आहेत. आजारपणामुळे डिसेंबरमध्ये ८८ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला होता. मात्र त्याच्या एक दिवस अगोदर हा व्हिडिओ बनवण्यात आला होता. नातेवाईक शिन जिंग जिया यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला. 

शिन जिंग जिया यांनी व्हिडिओ शेअर करताना लिहिलं की, अखेर आजोबा गेले, आजी लहान मुलीसारखी रडत होती. लग्नाच्या ६४ व्या वाढदिवसाच्या १ दिवस आधीच आजोबा निघून गेले. त्यांनी अशा मुलीला सोडलं जिनं आयुष्यभर त्यांची सेवा केली. हा व्हिडिओ ३२ मिलियन लोकांनी पाहिला आहे. वृद्ध जोडपे मंगोलियात राहायला होते. ते स्थानिक भाषेत बोलत होते. मृत वृद्ध व्यक्तीने पत्नीला सांगितले की, तू मजबूत हो, दुखा:मुळे स्वत:च्या गरजांना दुर्लक्ष करू नको.

वृद्ध नवऱ्याने जातेवेळी त्यांच्या पत्नीला सल्ला दिला. वृद्ध म्हणाला की, जर कुणीही नातू किंवा नात तुला दुखी करत असेल तर तडजोड नको करू. वचन दे, हे ऐकताना वृद्ध पत्नी सातत्याने रडत होती. त्यानंतर काही वेळ शांत राहून ती पतीला विचारते. मी तुझा तिरस्कार करते. तुला मला सोडून जाण्याची इतकी घाई का आहे? त्यानंतर वृद्ध पती पत्नीच्या चेहऱ्याला आणि खांद्यावर हात ठेवतो म्हणतो, तू रडू नको. मी तुला सोडून जात नाही परंतु माझ्याकडे कुठलाही पर्याय नाही. हा व्हिडिओ पाहून अनेकांचे डोळे नकळत पाणावले. 
 
 

Web Title: ‘I’m going now, don’t cry’: dying man’s last words to wife touch millions in China

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.