समोर सिनेमा चालू, पण याचे लॅपटॉपवर काय सुरू? व्यस्त जीवनशैलीचा उलगडा करणारा 'Video' पाहाच  

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2024 01:14 PM2024-01-18T13:14:15+5:302024-01-18T13:15:48+5:30

एक व्यक्ती चक्क सिनेमागृहात लॅपटॉप उघडून काम करताना दिसतोय. 

In Bengaluru a man doing her office work on laptop in cinema hall video goes viral on social media | समोर सिनेमा चालू, पण याचे लॅपटॉपवर काय सुरू? व्यस्त जीवनशैलीचा उलगडा करणारा 'Video' पाहाच  

समोर सिनेमा चालू, पण याचे लॅपटॉपवर काय सुरू? व्यस्त जीवनशैलीचा उलगडा करणारा 'Video' पाहाच  

Viral Video : हल्ली सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल याचा नेम नाही. भारतीची स्टार्टइअप राजधानी असणाऱ्या बंगळूरुमधून असाच एक व्हायरल व्हिडीओ समोर आला आहे. बंगळुरुमध्ये एक व्यक्ती चक्क चित्रपटगृहात लॅपटॉपवर काम करताना दिसतोय. याचा व्हिडीओही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी गंमतीशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.  

हे दृश्य बंगळुरुतील व्यस्त जीवनशैली दर्शवणारे आहे. कामाच्या ताणामुळे वैयक्तिक आयुष्यच माणसाला उरत नाही, अशा प्रतिक्रिया लोकांनी या व्हिडीओवर केल्या आहेत. 

व्हायरल व्हिडीओमध्ये एक व्यक्ती स्वागत सिनेमागृहात सकाळच्या शोदरम्यान बसलेली दिसत आहे. ही व्यक्ती समोर शो सुरू असतानाच ऑफिसचे काम करण्यात व्यस्त दिसत आहे. सिनेमागृहाच्या अंधारात त्याचा लॅपटॉप चमकताना दिसत आहे. 

पाहा व्हिडीओ: 

https://twitter.com/KrishnaCKPS/status/1746079917295685846?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1746079917295685846%7Ctwgr%5E1af2f810cc7e401b4ddc7f19b729a48827bbf628%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fsaamtv.esakal.com%2Fviral-videos%2Fbengalauru-theatre-viral-video-of-one-man-works-on-laptop-office-worl-at-cimema-hall-sh04

इनोव्हेशन आणि स्टार्टअपचे केंद्र असुनही, शहराच्या पायाभूत सुविधांचा वेग कमी असल्याने वाहतूक कोंडींचा मोठा प्रश्न आहे. अशा कमेंट्स करत नेटकऱ्यांनी अनेकांचे लक्ष वेधले आहे.

Web Title: In Bengaluru a man doing her office work on laptop in cinema hall video goes viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.