मजुरी करून शिकविले; आता ती मागतेय घटस्फोट, सरकारी नोकरी लागताच पत्नीने दिला धोका

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2024 01:11 PM2024-06-19T13:11:20+5:302024-06-19T13:13:26+5:30

पतीने पत्नीला काबाडकष्ट करून शिक्षण दिले; मात्र, पोलिसात नोकरी लागल्यावर तिने चक्क घटस्फोट मागितल्याचा प्रकार बिहारच्या बेगुसरायमध्ये समोर आला आहे.

in bihar begusarai after become police constable wife asked for divorce to her husband | मजुरी करून शिकविले; आता ती मागतेय घटस्फोट, सरकारी नोकरी लागताच पत्नीने दिला धोका

मजुरी करून शिकविले; आता ती मागतेय घटस्फोट, सरकारी नोकरी लागताच पत्नीने दिला धोका

Social Viral : पतीने पत्नीला काबाडकष्ट करून शिक्षण दिले; मात्र, पोलिसात नोकरी लागल्यावर तिने चक्क घटस्फोट मागितल्याचा प्रकार बिहारच्या बेगुसरायमध्ये समोर आला आहे. पतीने पत्नीला समजविण्याचा खूप प्रयत्न केला; पण पत्नी घटस्फोट घेण्यावर ठाम राहिली. त्यामुळे हे प्रकरण पोलिस ठाण्यापर्यंत गेल्याने हा प्रकार व्हायरल होत आहे. ११ वर्षांपूर्वी लग्न करून संसार थाटलेल्या विजय कुमारने पत्नी रोशनीने शिकण्याची इच्छा व्यक्त करताच तिला पाठिंबा दिला होता. 

पत्नीला यश मिळावे यासाठी विजयकुमारने अतिशय मेहनत घेतली. मजुरीही केली. त्यामुळे २०२२ मध्ये रोशनीला बिहार पोलिसात कॉन्स्टेबल म्हणून नोकरी लागली. ट्रेनिंगला जाण्यापूर्वी त्यांच्यात सर्व काही ठीक होते, लवकरच भेटू, असे सांगून ती निघून गेली. मात्र, प्रशिक्षणाला गेल्यानंतर दोघांमधील अंतर वाढू लागले. याचदरम्यान रोशनीने घटस्फोट हवा असे सांगितल्याने विजयला धक्काच बसला. त्याने समजविण्याचा प्रयत्न केला; पण, ती घटस्फोट घेण्यावर ठाम राहिली. सध्या या दोघांमध्ये तडजोड करण्याचे प्रयत्न चालू आहेत.

नेमकं प्रकरण काय?

माहितीनुसार, बिहारमधील बेगुसराय येथील डरहा गावातील हे प्रकरण सध्या चर्चेचा विषय ठरलं आहे. साधारण २०१३ मध्ये विजयकुमारचं लग्न नजीकच्या  सनहा गावामध्ये राहणाऱ्या रोशनीसोबत झालं. लग्नानंतर रोशनीने आपल्या पतीजवळ शिकण्याची इच्छा व्यक्त केली. विजयकुमारने आपल्या पत्नीची खंबीरपणे साथ देत तिच्या शिक्षणासाठी रात्रंदिवस मेहनत घेतली. अखेर त्याच्या मेहनतीला यश मिळालं. रोशनीला बिहार पोलिसात सरकारी नोकरी मिळाली. त्यानंतर अचानक एके दिवशी विजयची पत्नी आपल्या माहेरच्या माणसांना घरी घेऊन आली आणि आपल्याला घटस्फोट पाहिजे असं तिने विजयकुमारला स्पष्ट सांगितलं. सासरच्या मंडळींनी रोशनीच्या निर्णयाला कडाडून विरोध केला. याचंच रुपातंर वादात झालं आणि प्रकरण पोलिसांपर्यंत पोहचलं. 

Web Title: in bihar begusarai after become police constable wife asked for divorce to her husband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.