कॉलेजला जाणाऱ्या मेहुणीला दाजीनं अडवलं; कारमध्ये गुंगीचा लाडू देऊन मंदिरात केलं लग्न!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2022 05:04 PM2022-10-28T17:04:43+5:302022-10-28T17:06:35+5:30
अल्पवयीन तरूणीचे अपहरण करून तिच्याशी विवाह केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
नवी दिल्ली : अल्पवयीन तरूणीचे अपहरण करून तिच्याशी विवाह केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विशेष म्हणजे नात्याने दाजी असलेल्या व्यक्तीने अल्पवयीन मेहुणीला गुंगीचे लाडू खाऊ घालून तिचे अपहरण केले. याशिवाय तिला मंदिरात नेऊन तिच्याशी लग्न केले. या अनोख्या लग्नाचा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. या प्रकरणी पीडित तरूणी न्यायासाठी पोलीस अधिकाऱ्यांकडे चकरा मारत आहे. पीडितेच्या नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, तरूणीसोबत ही घटना घडली तेव्हा ते कामानिमित्त गुजरातमधील अहमदाबाद येथे होते.
गुंगीचा लाडू देऊन केले लग्न
पीडितीने दिलेल्या माहितीनुसार, ती छत्तीसगढ रायपूर पोलीस स्टेशन हद्दीतील अत्रौली गावातील रहिवासी असून कृषक इंटर कॉलेजमध्ये इयत्ता नववीत शिकत आहे. 12 ऑक्टोबर रोजी कॉलेजला जाताना तिचा दाजी अवधेश केसरवाणी हा 'बसला' गावाजवळ चारचाकी गाडीत आपल्या कुटुंबीयांसोबत तिला भेटला. 'मी तुला कॉलेजला सोडतो' असे तो म्हणाला. पीडिता गाडीत बसताच तिला त्याने गुंगीचा लाडू खायला दिला, त्यानंतर ती बेशुद्ध झाली. पीडितेच्या म्हणण्यानुसार, अवधेशने तिला कॉलेजमध्ये न सोडता एका मंदिरात नेऊन साडी नेसून लग्न केले आणि काही बोलल्यास जीवे मारण्याची धमकी देखील दिली.
पीडीतेच्या कुटुंबीयांकडून खटला दाखल
आरोपी दाजीने लग्न केल्यानंतर पीडितेला खजुरिया कला गावातील तिच्या घरी नेऊन तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला आणि त्यानंतर रात्री 8 वाजता तिला अत्रौली गावाबाहेर सोडले. तिथून पीडितेने घरी पोहोचून तिच्या आईला सर्व घटनेची माहिती दिली. ही सर्व हकीकत पीडितेच्या आईने अहमदाबाद येथे असलेल्या आपल्या पती आणि मुलाला फोनवरून सांगितली. पीडितेचे वडील आणि भाऊ अहमदाबादहून आले आणि त्यांनी रायपूर पोलीस ठाण्याच्या पोलिसांना ही बाब सांगितली. मात्र पोलिसांनी कारवाई न केल्याने नाराज झालेल्या पीडितेने तिच्या नातेवईकांसह बुधवारी जिल्हा मुख्यालय कारवी गाठून अधीक्षकांना माहिती दिली. या घटनेबाबत पोलीस अतुल शर्मा यांनी माहिती देताना पीडितेला न्याय मिळेल असे सांगितले.
मंदिरात लग्न केल्याचे फुटेज आले समोर
पीडितेचे वडील आणि भाऊ यांनी आरोपी अवधेश केसरवानी आणि त्याच्या नातेवाईकांवर अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याचा आरोप केला आहे. तसेच बळजबरीने मंदिरात लग्न लावल्याचा आरोप करत रायपुरा पोलीस ठाण्यातील पोलीस ऐकत नसल्याचा गंभीर आरोपही केला. आरोपी अवधेश केसरवाणी व त्याच्या नातेवाईकांवर कायदेशीर कारवाई करून न्याय देण्याची मागणी पीडितेच्या भाऊ व वडिलांनी केली आहे. पीडितेच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, मंदिरात लग्न केल्याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्याचा फोटोही अर्जासोबत जोडण्यात आला आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"