बापरे! घराच्या खिडकीबाहेर लटकत होती चिमुकली; जमावाच्या युक्तीमुळे अशी झाली सुटका  

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2024 03:53 PM2024-06-28T15:53:09+5:302024-06-28T15:57:38+5:30

घरी लहान मुलं असली तर त्या घरातील प्रत्येक सदस्याने अगदी सतर्क राहणं गरजेचं असतं.

in china a young child becomes stuck in window video goes viral on social media | बापरे! घराच्या खिडकीबाहेर लटकत होती चिमुकली; जमावाच्या युक्तीमुळे अशी झाली सुटका  

बापरे! घराच्या खिडकीबाहेर लटकत होती चिमुकली; जमावाच्या युक्तीमुळे अशी झाली सुटका  

Social Viral : घरी लहान मुलं असली तर त्या घरातील प्रत्येक सदस्याने अगदी सतर्क राहणं गरजेचं असतं. लहान मुलं घरी असली तर सावध राहावं लागतं. शिवाय मुलं मोठी होत असताना त्यांच्याकडे डोळ्यात तेल घालून लक्ष देणं गरजेचं आहे. ही चिमुकली पार्टी पायावर उभी राहायला शिकली बस्स! मग संपूर्ण घर पालथं घातल्याशिवाय ते काय ऐकत नाही. कधीही, कुठेही आणि  काहीही करायला ही मंडळी मोकळीच. सध्या धकाधकीच्या लाईफस्टाईलमुळे पालकांचही आपल्या पाल्याकडे दूर्लक्ष होतं. कामाचा व्याप त्यात अतिरिक्त वाढलेली कामं ही वेगळीच असतात. त्यामुळे बऱ्याचदा मुलांकडे त्यांच लक्ष राहत नाही आणि त्यामुळे नको ते प्रकार घडतात. असाच एक अनुचित प्रकार घडल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे.

सध्या चीन मधील एका लहान मुलीचा व्हिडिओ चर्चेचा विषय ठरतोय. या व्हिडिओमधील दृश्य पाहून अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाही. त्यामध्ये एक लहान मुलगी तिच्या घरातील खिडकीमधून बाहेर लटकताना दिसतेय.  खिडकीच्या बाहेरील बाजूस लोंबकळत असलेल्या वायरचा आधार घेत ही मुलगी त्यावर उभी आहे. 

व्हायरल व्हिडिओमध्ये या लहान मुलीला वाचवण्यासाठी मोठ्या संख्येने काही माणसे तिथे जमा झाली आहेत. जमलेला प्रत्येकजण त्या मुलीला वाचवायला प्रयत्न करताना दिसत आहेत. एका टेबलचा आधार घेत मानवी साखळी बनवून एक माणुस खिडकीजवळ पोहचण्याचा प्रयत्न करतोय.अखेर शर्थीच्या प्रयत्नानंतर खिडकीत अडकलेल्या या मुलीला सुखरुप सुटका करण्यात येते. 

व्हायरल व्हिडियो 'Sach kadwa hai' या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच हा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी बचावकार्य करणाऱ्या जमावाचं कौतुक केलं आहे. व्हायरल व्हिडिओवर एक नेटकरी कमेंट करत लिहितो, " खूप चांगलं काम केलंत"  तसेच आणखी एका यूजरने  व्हिडिओवर " देवाचे आभार" अशी कमेंट केली आहे. 

Web Title: in china a young child becomes stuck in window video goes viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.