पेंगत पेंगत मास्तर आला शाळेत; मुलांचे येणेच झाले बंद आणि पुढे जे झालं...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2024 12:35 PM2024-02-08T12:35:39+5:302024-02-08T12:39:35+5:30
शिक्षकाला वारंवार सक्तीची ताकिद देऊनही त्याच्या वागण्यात काहीही बदल झाला नाही. दारूच्या नशेत शाळेत आलेल्या शिक्षकाला शिक्षण विभागाने निलंबित केलं आहे.
Social Viral : मध्य प्रदेशातील जबलपूर येथील एका सरकारी शाळेचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. एक शिक्षक शाळेत मद्यधुंद अवस्थेत पोहोचला. शाळेत पोहोचल्यानंतर त्याला स्वतःवर नियंत्रण ठेवता आले नाही आणि तो तिथेच पडला. शिक्षकाची ही अवस्था पाहून शाळेतील मुलेही घाबरली. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आरोपी शिक्षकाला निलंबित करण्यात आले आहे.
जबलपूरच्या ग्रामीण भागातील बाकरा येथील जमुनिया शाळेत हा प्रकार समोर आला आहे. या शाळेतील एक शिक्षक मद्यधुंद अवस्थेत दिसला. शिक्षक इतका मद्यधुंद अवस्थेत होता की, त्याला कशाचीही फिकीर नव्हती. शिक्षकाची ही अवस्था पाहून शाळेतील मुलेही घाबरली. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
जमुनिया सरकारी शाळेत तैनात असलेल्या या शिक्षकाचे नाव राजेंद्र नेताम असून, तो बऱ्याच दिवसांपासून याच शाळेत शिकवत आहे. तो अनेकदा दारूच्या नशेत शाळेत येतो. या अगोदरही मुलांनी व पालकांनी शिक्षकाविरोधात तक्रारी करूनही अधिकाऱ्यांनी त्याकडे लक्ष दिले नाही. या शिक्षकाच्या भीतीने मुलांनीही शाळेत येणे बंद केले आहे.
#जबलपुर में बच्चों ने शराबी टीचर का मोबाईल से बनाया वीडियो और कर दिया वायरल कर दिया.बघराजी संकुल के शासकीय प्राथमिक शाला जमुनिया में पदस्थ शिक्षक राजेन्द्र नेताम को शराब पीकर स्कूल आने पर सस्पेंड कर दिया गया है.@abplive@DrMohanYadav51@schooledump@DM_Jabalpurpic.twitter.com/ef0wKkhZYx
— AJAY TRIPATHI (ABP News) (@ajay_media) February 5, 2024
दरम्यान, या प्रकरणावर गावातील ग्रामस्थांनी देखील संतप्त प्रतिकिया दिल्या आहेत. सर्वच बाजूंनी या शिक्षकावर संतापाचा सूर उमटत आहे.