करमत नाही म्हणून होणाऱ्या बायकोला नेलं पळवून; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, नंतर मंदिरात लावलं लग्न

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2022 04:04 PM2022-12-04T16:04:20+5:302022-12-04T16:04:58+5:30

होणाऱ्या बायकोला भेटण्याची उत्सुकता इतकी वाढली की लग्नाआधीच नवरदेव तिच्यासोबत पळून गेला.

In Panapur block of Chhapra, Bihar, a young man and a young woman got married by the police | करमत नाही म्हणून होणाऱ्या बायकोला नेलं पळवून; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, नंतर मंदिरात लावलं लग्न

करमत नाही म्हणून होणाऱ्या बायकोला नेलं पळवून; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, नंतर मंदिरात लावलं लग्न

googlenewsNext

नवी दिल्ली : आपल्या होणाऱ्या बायकोला भेटण्याची उत्सुकता इतकी वाढली की लग्नाआधीच नवरदेव तिच्यासोबत पळून गेला. मुलगी गायब होताच मुलीच्या घरात एकच खळबळ उडाली होती, मात्र नंतर जेव्हा लोकांना समजले की मुलगी तिच्या भावी पतीसोबत पळून गेली आहे तेव्हा लोकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला, मात्र तोपर्यंत पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. ही अनोखी घटना बिहारमधील छपराच्या पानापूर ब्लॉकमध्ये घडली आहे.

दरम्यान, दरियापूर पोलीस स्टेशन हद्दीतील अकबरपूर गावात राहणाऱ्या बोल बम साहनीसोबत राम रुद्रपूर गावातील संध्या नावाच्या मुलीचे लग्न ठरले होते. लग्नाचा निम्मा विधी पार पडला होता, त्यामुळे दोन्ही पक्ष लग्नाच्या तयारीत मग्न होते, पण लग्न पुढच्या वर्षी होणार होते. त्यामुळे संध्या आणि बोलबम यांच्यात रोज चर्चा व्हायची. या जोडप्यामधील प्रेम इतके वाढले की बोलबम संध्याशिवाय एक क्षणभरही राहू शकत नव्हता. म्हणून दोघांनी एक प्लॅन केला आणि संध्या काहीही न बोलता घरातून पळून गेली. नंतर हे जोडपे एका अज्ञात स्थळी गेले. 

पोलिसांनी लावून दिले लग्न 
या प्रकरणी पनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला, त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू करून मुलीला ताब्यात घेतले. मात्र या जोडप्यांनी सगळे काही मान्य केल्यानंतर घरचे देखील काही करू शकले नाहीत. त्यामुळे पोलिसांनीही दोघांचे लग्न लावून देण्याचा निर्णय घेतला. दोघांच्या नातेवाईकांच्या संमतीने स्थानिक पोलिसांच्या देखरेखीखाली ठाकूरबारी मंदिरात विवाह पार पडला. पनापूर बाजार येथील रामजानकी मंदिरात स्थानिक पोलीस ठाण्याच्या एसआय रुपम कुमारी यांनी दोन्ही पक्षांचे नातेवाईक आणि लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत दोघांचा विवाह सोहळा पार पडला. हा अनोखा विवाह परिसरात चर्चेचा विषय बनला आहे. मात्र दोघांचे लग्न ठरले असताना देखील ते का पळून गेलेत याची सर्वत्र चर्चा रंगली आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: In Panapur block of Chhapra, Bihar, a young man and a young woman got married by the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.