भारत-पाक लेस्बियन कपलने केलं Break-up, लग्न होणार इतक्या दोघींनी घेतला निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2024 03:36 PM2024-03-27T15:36:28+5:302024-03-27T15:36:48+5:30

अंजलीने पाकिस्तानच्या सूफीवर दगा दिल्याचा आरोप केला आहे. ज्यामुळे सूफीला ट्रोल केलं जात आहे.

India Pakitan lgbtq couple Anjali Chakra and Sufi Malik break up before wedding | भारत-पाक लेस्बियन कपलने केलं Break-up, लग्न होणार इतक्या दोघींनी घेतला निर्णय

भारत-पाक लेस्बियन कपलने केलं Break-up, लग्न होणार इतक्या दोघींनी घेतला निर्णय

Anjali Chakra and Sufi Malik Breakup: खूप दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत राहिलेलं लेस्बियन कपल म्हणजे भारतातील सोशल मीडिया इंफ्लूएंसर अंजलि चक्रा आणि पाकिस्तानची सूफी मलिक यांचं आता ब्रेकअप झालं आहे. दोघींनीही त्यांचं नातं संपल्याची घोषणा सोशल मीडियावरून केली आहे. काही महिन्यांआधी त्याचं रिलेशनशिप सुरू झालं होतं आणि याची सोशल मीडियावर खूप चर्चा झाली होती. अंजलीने पाकिस्तानच्या सूफीवर दगा दिल्याचा आरोप केला आहे. ज्यामुळे सूफीला ट्रोल केलं जात आहे.

सोशल मीडिया इंफ्लूएंसर अंजली चक्रा आणि सूफी मलिक पाच वर्षापासून एकमेकींना ओळखतात. आता हे कपल वेगळं झाल्याने सोशल मीडिया यूजर हैराण झाले आहेत. न्यूयॉर्कच्या एम्पायर स्टेट बिल्डिंगमध्ये सूफीने अंजलीला प्रपोज केलं होतं. हा क्षण त्यांनी कॅमेरात कैद केला होता. त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. पण आता त्यांनी इन्स्टावर पोस्ट करून वेगळे झाल्याची घोषणा केली आहे. हे कपल दक्षिण आशियाई संस्कृती आणि समलैंगिक प्रेमाच्या वाइब्रेंस सेलिब्रेशनसाठी 2019 मध्ये चर्चेत आलं होतं.

सूफीने इन्स्टा पोस्टमध्ये लिहिलं की, 'मी आमच्या लग्नाच्या काही आठवड्यांआधी तिला दगा देऊन चुकीचं केलं. मी तिला फार दु:खं दिलं. ज्याचा मी विचारही करू शकत नाही. मला माझी चुकी मान्य आहे'. तेच अंजलीने लिहिलं की, 'या गोष्टीने धक्का बसू शकतो, पण आमचे मार्ग आता वेगळे झाले आहेत. सूफीने दगा दिल्याने आम्ही आमचं लग्न कॅन्सल करण्याचा आणि हे नातं संपवण्याचा निर्णय घेतला आहे'.

Web Title: India Pakitan lgbtq couple Anjali Chakra and Sufi Malik break up before wedding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.