जबरदस्त! भारतीय सैन्यांनी चीनी सैन्यांना चारली धूळ, रस्सीखेच खेळात मिळवला विजय!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2024 01:26 PM2024-05-29T13:26:15+5:302024-05-29T13:26:38+5:30
Indian Army Viral Video : सध्या एक व्हिडीओ व्हायरल झाला असून रस्सीखेच या खेळात भारतीय सैन्यांनी चीनी सैन्यांना मात दिली आहे.
Indian Army Viral Video : भारत आणि चीनच्या सीमेवर सैन्यांमध्ये नेहमीच वेगवेगळ्या गोष्टींवरून वाद होत असतात. चीनचे सैनिक भारताच्या जमिनीवर अतिक्रमण करतात किंवा भारतीय जागेवर त्यांच्या चौकी बनवतात. भारतीय सैन्यांनीही वेळोवेळी चीनी सैन्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे. आता पुन्हा एकदा भारतीय सैन्यांनी चीनच्या सैन्यांना धुळ चारली आहे. पण ही धुळ युद्धाच्या मैदानात नाही तर खेळाच्या मैदानात चारली आहे. सध्या एक व्हिडीओ व्हायरल झाला असून रस्सीखेच या खेळात भारतीय सैन्यांनी चीनी सैन्यांना मात दिली आहे.
@borderaffairs.in नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्यात भारतीय सैन्य आपल्या विजयानंतर जल्लोष करताना दिसत आहेत. तुम्ही बघू शकता की, मैदानात भारतीय सैन्य आणि चीनी सैन्य रस्सीखेच खेळ खेळत आहेत. या खेळाचं आयोजन संयुक्त राष्ट्राच्या शांती मिशन अंतर्गत करण्यात आलं होतं. हे खेळ आफ्रिकेच्या सुडानमध्ये सुरू होते. रस्सीखेचला टग-ऑफ-वॉर असंही म्हणतात. ज्यात एक जाड दोर दोन्ही बाजूने काही लोक पडतात आणि मधे एक लाइन केलेली असते. जी टीम ही लाइन क्रॉस करेल ते हरतात.
भारतीय सैनिकांनी किती चांगलं प्रदर्शन करून चीनी सैनिकांना मात दिली हे तुम्ही व्हिडीओत बघू शकता. हे बघत असताना तुम्हालाही अभिमान वाटतो. जसा भारतीय सैनिकांचा विजय होतो ते ढोलताशांच्या तालावर नाचू लागतात.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर लोकांकडून खूप शेअर केला जात आहे. तसेच या व्हिडीओला खूपसारे लाइक्स मिळत आहेत. बरेच लोक यावर वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत आणि भारतीय सैन्यांना शुभेच्छाही देत आहेत.