कडक सॅल्यूट! भर वादळातही ठामपणे उभा आहे सेनेचा जवान, गुडघ्यापर्यंत बर्फात करत राहिला भारत मातेची सुरक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2022 03:44 PM2022-01-08T15:44:53+5:302022-01-08T15:45:39+5:30
Indian Army Viral Video: एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात एक भारतीय सेनेतील जवान बर्फवृष्टी आणि जोराच्या वाऱ्यातही जागेवरून हलत नाहीये.
Indian Army Viral Video: थोडीशी थंडी पडली तर लोक आपापल्या घरात ब्लॅंकेट अंगावर घेऊन बसता. थंडीच्या दिवसात स्वेटर, दोन दोन ब्लॅंकेट घेऊन झोपतात जेणेकरून थंडी लागू नये. तेच आपले सेनेतील जवान बर्फाच्या वादळताही भारत मातेची सेवा करण्यासाठी ठामपणे उभे असतात. एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात एक भारतीय सेनेतील जवान बर्फवृष्टी आणि जोराच्या वाऱ्यातही जागेवरून हलत नाहीये. गुडघ्यापर्यंतच्या बर्फात उभा राहून त त्याचं कर्तव्य पार पाडताना दिसत आहे.
आपल्या सैनिकांनी नेहमीच आपल्या शौर्याने आणि पराक्रमाने आपल्या देशाचं नाव उंचावलं आहे. आपण नेहमीच भारतीय सैनिकांच्या ध्येर्याचे आणि बहादुरीचे किस्से ऐकत असतो. पण या व्हिडीओ पाहून नक्की तुम्हाला आपल्या जवानांचा गर्व वाटेल आणि त्यांच्या विषयी तुमच्या मनात अधिक जास्त सन्मान निर्माण होईल.
हा व्हिडीओ ट्विटरवर संरक्षण मंत्रालयाचे उधमपुर जनसंपर्क अधिकाऱ्याने त्यांच्या अधिकृत हॅंडलवर शेअर केला आहे. व्हिडीओ ट्विट करत त्यांनी लिहिलं की, 'आपण आपल्या लक्ष्यापर्यंत सहजपणे पोहोचू शकत नाही. पण प्रबळ इच्छाशक्ती आणि बलिदानाने आपण आपलं लक्ष्य मिळवू शकतो. जगण्यासाठी सगळ्यांकडे एक जीवन आहे. पण देशाचा मुद्दा असेल तर कोण उभा राहतो?'.
No easy hope or lies
— PRO Udhampur, Ministry of Defence (@proudhampur) January 7, 2022
Shall bring us to our goal,
But iron sacrifice
Of body, will, and soul.
There is but one task for all
One life for each to give
Who stands if Freedom fall? pic.twitter.com/X3p3nxjxqE
व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, एक भारतीय सैनिक बर्फाच्या वादळात आपल्या हातात रायफल घेऊन गुडघ्यापर्यंतच्या बर्फात उभा आहे. हा सैनिक जराही न डगमगता आपल्या डावी आणि उजवीकडे बघत आहे. इतक्या वादळातही सैनिक आपली पोस्ट सोडून गेला नाही. हा व्हिडीओ काश्मीर बॉर्डरचा असल्याचं सांगण्यात येत आहे.