Viral Video Troll: बोल्ड फोटोंमुळे चर्चेत असलेली भारतीय क्रिकेटपटूची पत्नी व्हिडीओमुळे झाली ट्रोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2022 21:37 IST2022-07-25T21:30:34+5:302022-07-25T21:37:15+5:30
तुम्ही हा व्हिडीओ पाहिलात का?

Viral Video Troll: बोल्ड फोटोंमुळे चर्चेत असलेली भारतीय क्रिकेटपटूची पत्नी व्हिडीओमुळे झाली ट्रोल
Viral Video, Trolling: मोहम्मद शमीची (Mohammad Shami) पत्नी हसीन जहाँ (Hasin Jahan) हिने तिचा एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. नेहमी ती तिच्या हॉट आणि बोल्ड फोटो, व्हिडीओंमुळे चर्चेत असते. पण आता तिने जो व्हिडीओ पोस्ट केला आहे त्यानंतर चाहत्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. हसीन जहाँ सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. हसीन जहाँ इन्स्टाग्रामवर तिचे फोटो आणि व्हिडिओ सतत शेअर करून चर्चेत असते. पण आजच्या व्हिडीओमुळे मात्र तिला ट्रोल केलं जातंय.
--
मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँने तिचा एक लेटेस्ट व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हसीन जहाँचा हा व्हिडिओ इंटरनेटवर बऱ्यापैकी व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये हसीन जहाँ म्हणताना दिसत आहे की, 'आम्ही कधीही सुधरणार नाही..' खरं पाहता हा व्हिडीओ अतिशय धमाल-मस्तीच्या मूडमध्ये शूट करण्यात आला आहे. पण हसीन जहाँच्या या व्हिडिओवर चाहते सतत कमेंट करून तिला ट्रोल करत आहेत. पाहा व्हिडीओ-
हसीन जहाँच्या या व्हिडिओवर कमेंट करताना एका चाहत्याने लिहिले की, 'यात काही शंका नाही (की तू सुधरणार नाहीस)'. त्याच वेळी आणखी एका चाहत्याने कमेंट करत लिहिले की, 'शमी भाई सोबत राहून पण तू सुधरली नाहीस, तर आता तू काय सुधारणार आहेस'. हसीन जहाँच्या या व्हिडीओवर काही चाहते चांगल्या प्रतिक्रियाही देत आहेत. पण त्यासोबतच तिला ट्रोलही व्हावं लागतंय.
दरम्यान, मोहम्मद शमी सोबतच्या वादामुळे हसीन जहाँ तिच्या मुलीसोबत बऱ्याच दिवसांपासून वेगळी राहत आहे. या दोघांमध्ये बराच काळ वाद सुरू आहे. दोघांमध्ये अद्याप घटस्फोट झाला की नाही, याची अधिकृत माहिती नाही. मोहम्मद शमी आणि हसीन जहाँ यांचा विवाह ७ एप्रिल २०१४ रोजी झाला होता. काही वर्षांनंतर शमीच्या पत्नीने त्याच्यावर इतर महिलांसोबत संबंध असल्याचा आरोप केला होता. तसेच त्याच्यावर मारहाण, अत्याचारासारखे गंभीर आरोपही केले होते.