भारतीय तरुणी पाकिस्तानी मुलीच्या पडली प्रेमात अन् बांधली लग्नगाठ, लव्हस्टोरी तुफान व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2022 09:58 AM2022-07-23T09:58:52+5:302022-07-23T10:09:09+5:30

Indian Pakistan Lesbian Couple Love Story बियांका आणि साइमाचे जेव्हा लग्न झाले तेव्हा दोघींच्या या अनोख्या प्रेमाची गोष्ट आणि काही फोटो हे खूप व्हायरल झाले.

indian pakistan lesbian couple love story goes viral | भारतीय तरुणी पाकिस्तानी मुलीच्या पडली प्रेमात अन् बांधली लग्नगाठ, लव्हस्टोरी तुफान व्हायरल

फोटो - इन्स्टाग्राम, सोशल मीडिया

googlenewsNext

प्रेमासाठी काही लोक वाटेल ते करतात. त्यांच्या प्रेमाचे असंख्य किस्से हे नेहमीच व्हायरल होत असतात. अशीच एक हटके घटना आता समोर आली आहे. एक भारतीय तरुणी पाकिस्तानी तरुणीच्या प्रेमात पडली असून दोघींनीही लग्नगाठ बांधली आहे. त्यांच्या लव्हस्टोरीची चर्चा सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मूळची भारतीय असलेली बियांका माईली आणि पाकिस्तानची साइमा अहमदी यांच्य़ा लव्हस्टोरीची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे. 

बियांका आणि साइमा यांनी 2019 मध्ये अमेरिकेत लग्न केलं आहे. या दोघींचा फक्त देशच नाही तर दोघींचे धर्मही वेगवेगळे आहेत. बियांका ख्रिश्चन आहे आणि तिची जोडीदार साइमा ही मुस्लिम आहे. बियांका ही कोलंबियन-भारतीय आहे. 2014 मध्ये अमेरिकेत एक इव्हेंट होता. याच कार्यक्रमादरम्यान तिची साइमाशी भेट झाली. 2014 पासून त्य़ा एकमेकींना डेट करत होत्या. त्यांनी एकमेकींना तब्बल पाच वर्षे डेट केले आणि नंतर 2019 मध्ये कॅलिफोर्नियात लग्न केलं आहे. 

बियांका आणि साइमाचे जेव्हा लग्न झाले तेव्हा दोघींच्या या अनोख्या प्रेमाची गोष्ट आणि काही फोटो हे खूप व्हायरल झाले. त्याच्या ड्रेसेसचही कौतुक झाले. बियांका साडीत दिसली. त्याचवेळी साइमाने या खास प्रसंगासाठी काळ्या रंगाची शेरवानी परिधान केली होती. बियांका आणि साइमाचे अनेक चाहते आहेत. त्याच्या फोटोतून आणि गोष्टीतून लोकांना प्रेरणा मिळते. सध्या त्यांची लव्हस्टोरी जोरदार व्हायरल होत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: indian pakistan lesbian couple love story goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.