'टॉयलेटला गेलो, तिथे पाणी नाही; आता मी काय करू?', तरुणाची रेल्वेला तक्रार; नेटकऱ्यांनी घेतली फिरकी...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2023 01:31 PM2023-03-12T13:31:09+5:302023-03-12T13:31:59+5:30
ट्रेनमध्ये प्रवास करणारा तरुण टॉयलेटला गेला, पण तिथे पाणी नव्हते. यानंतर त्याने थेट ट्विट करत रेल्वेकडे तक्रार केली.
Viral Post : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल, हे सांगता येत नाही. सध्या अरुण नावाचा एक व्यक्ती चांगलाच व्हायरल होत आहे. त्याचे कारण म्हणजे, त्याने ट्विटरवर इंडियन रेल्वेकडे केलेली तक्रार आहे. तो ट्रेनमधून प्रवास करत होता, यावेळी त्याल एका अडचणीचा सामना करावा लागला आणि त्याने रेल्वेकडे तक्रार केली. त्याचे हेच ट्विट सध्या व्हायरल होत आहे. अनेक नेटकरी त्याच्या या ट्विटरवर मजेशीर प्रतिक्रियाही देत आहेत.
असुविधा के लिए खेद है। हम आपसे अनुरोध करते हैं कि कृपया यात्रा विवरण (पीएनआर/यूटीएस नंबर) और मोबाइल नंबर वैकल्पिक रूप से DM के माध्यम से हमारे साथ साझा करें। आप अपनी शिकायत सीधे https://t.co/AmJ5X4xFpA पर भी शीघ्र निवारण के लिए रजिस्टर कर सकते हैं।
— RailwaySeva (@RailwaySeva) March 11, 2023
अरुण नावाचा व्यक्ती ट्रेनमधून प्रवास करत होता, यावेळी त्याला टॉयलेट(सौच) आली. पण, ट्रेनच्या टॉयलेटमध्ये पाणी नसल्यामुळे त्याने आपली टॉयलेट रोखून धरली. यानंतर अरुणने आपल्या ट्विटर (@ArunAru77446229) हँडलवरुन थेट रेल्वे विभागाकडे तक्रार केली. आपल्या तक्रारीत त्याने ट्रेनच्या टॉयलेटमध्ये पाणी नसल्याचे सांगितले. तसेच, पाणी नसल्यामुळे त्याला शौचालयालाही जाता आले नसल्याचे ट्विटमध्ये म्हटला.
बहुत बहुत धन्यवाद इंडियन रेल्वे pic.twitter.com/946gkb5Kyd
— Arun Arun (@ArunAru77446229) March 11, 2023
'पद्मावत एक्सप्रेस (14207) मध्ये प्रवास करत आहे टॉयलेटला गेलो तर पाणी नाही, आता मी काय करू..? परत माझ्या सीटवर येऊन बसलो. ट्रेनही 2 तास उशीराने धावत आहे,' अस् ट्विट अरुणने केले होते. अरुणच्या या ट्विटवर रेल्वे विभागाने त्याला उत्तर दिले. रिल्वेने अरुणला प्रवासाचा संपूर्ण तपशील विचारला आणि तक्रारीचे निराकरण करण्याचे आश्वासन दिले. यानंतर आणखी एका ट्विटमध्ये अरुणने भारतीय रेल्वेचे आभार मानले.
अरुणचे ट्विट व्हायरल
अरुणची ही तक्रारदार काही वेळातच व्हायरल झाली. त्याच्या या ट्विटवर शेकडो लोकांनी प्रतिक्रिया दिल्या. अरुणचे ट्विटरवर केवळ 19 फॉलोअर्स असले तरी त्याच्या ट्विटला अडीच लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले. अनेक युजर्सनी त्याचे वर्णन सेल्फ मेड सेलिब्रिटी असे केले आहे.
एका यूजरने लिहिले - अरुणची तक्रार न्याय्य आहे. दुसरा म्हणाला - भाऊ दुसऱ्या डब्यात जायचं ना. तर, तिसऱ्याने लिहिले - हा प्रश्न WHO समोर उपस्थित कर. आणखी एका यूजरने लिहिले - नाही, UN मध्ये घेऊन जा. अमृता लिहिते- अरुणजींसाठी हा संकटाचा काळ आहे, मी त्यांच्या संयमाचे कौतुक करते. किशन म्हणाला- अरुणजींच्या चेहऱ्यावर त्रास स्पष्ट दिसत आहे. कृष्ण कुमार म्हणाला- तुम्ही स्वच्छता मोहिमेत दिलेल्या प्रशंसनीय योगदानाबद्दल सर्व भारतीयांना तुमचा अभिमान आहे.