आरारारारा खतरनाक! तुमच्यापेक्षा आमचे रिक्षावाले भारी गाड्या उडवतात; चिनी सैनिकांच्या ड्रायव्हिंगची सोशल मीडियावर खिल्ली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2020 04:10 PM2020-07-02T16:10:45+5:302020-07-02T16:20:33+5:30

@ChinaJingXi या ट्विटर यूजरने जेव्हा चिनी सेनेच्या ड्रायव्हिंग स्किलचा व्हिडीओ शेअर केला तर त्यावर भारतीय लोकांनी आपल्या देसी ड्रायव्हिंग स्किलचे एकापेक्षा एक भारी व्हिडीओ टाकले.

Indian twitter reaction on Driving skills of PLA soldiers china video viral | आरारारारा खतरनाक! तुमच्यापेक्षा आमचे रिक्षावाले भारी गाड्या उडवतात; चिनी सैनिकांच्या ड्रायव्हिंगची सोशल मीडियावर खिल्ली

आरारारारा खतरनाक! तुमच्यापेक्षा आमचे रिक्षावाले भारी गाड्या उडवतात; चिनी सैनिकांच्या ड्रायव्हिंगची सोशल मीडियावर खिल्ली

Next

भारत आणि चीन यांच्यात सीमा वाद चांगलाच तापला आहे. वाद इतका पेटला की, 15 जूनला दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये झडप झाली आणि त्यात 20 भारतीय जवान शहीद झाले होते. त्यानंतर चीनबाबतचा रोष देशातील जनतेत बघायला मिळतो आहे. चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्यासाठी सोशल मीडियात ट्रेन्डही चालवला जातोय.

अशात भारत सरकारने चिनी कंपन्यांचे तब्बल 59 अ‍ॅप्स बॅन केलेत. ज्यात टिकटॉक अ‍ॅपही आहे. दरम्यान @ChinaJingXi या ट्विटर यूजरने जेव्हा चिनी सेनेच्या ड्रायव्हिंग स्किलचा व्हिडीओ शेअर केला तर त्यावर भारतीय लोकांनी आपल्या देसी ड्रायव्हिंग स्किलचे एकापेक्षा एक भारी व्हिडीओ टाकले.

हा व्हिडीओ काही महिने जुना आहे. हा व्हिडीओ @ChinaJingXi नावाच्या यूजरने 26 जून रोजी शेअर केला होता. त्याने कॅप्शन लिहिले की, 'चीन पीएलएच्या जवानांची हैराण करणारी ड्रायव्हिंग स्किल्स'. या व्हिडीओला हे आर्टिकल लिहेपर्यंत 7 लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले. तर 1.5 हजारापेक्षा अधिक लाइक्स आणि 2.2 हजार रि-ट्विट मिळाले आहेत. या पोस्ट भारतीय यूजर्सनी असे असे व्हिडीओ शेअर केले की, ते बघून थक्क व्हायला होतं.

हे सर्व व्हिडीओ भारतातील वेगवेगळ्या भागातील आणि सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत. हे सर्वसामान्य लोकही  चिनी सेनेपेक्षा भारी स्टंट करताना दिसत आहेत. हे व्हिडीओ शेअर करून एकंदर भारतीय यूजर्सला हे दर्शवायचं आहे की, भारतीय लोक चिनी सेनेपेक्षा भारी स्टंट करू शकतात.

अद्भूत! अंतराळवीराने शेअर केलेला फोटो झाला व्हायरल, पहिल्यांदाच दिवस अन् रात्र एकाच फ्रेममध्ये बघा...

अंग गोठवणाऱ्या थंडीत बर्फाचा केक तयार केला; अन् जवानाचा वाढदिवस साजरा झाला; पाहा व्हिडीओ

शाब्बास! आठवीच्या मुलाचा अविष्कार पाहून व्हाल चकीत; रेल्वेमंत्रालयानेही केला कौतुकाचा वर्षाव

Web Title: Indian twitter reaction on Driving skills of PLA soldiers china video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.