भारीच! काश्मीरमध्ये उघडलं भारतातलं पहिलं Igloo Cafe; पर्यटक करताहेत भन्नाट इन्जॉय, पाहा फोटो
By Manali.bagul | Published: January 29, 2021 06:50 PM2021-01-29T18:50:16+5:302021-01-29T18:55:58+5:30
Travel Tips in Marathi : हा इग्लू कॅफे बर्फानं तयार झालेला असून यात बर्फापासून तयार झालेले टेबल आहेत. यावर ग्राहकांना गरम गरम जेवण वाढण्यात येतं.
माहामारीच्या काळात पर्यटन व्यवसायावर सगळ्यात जास्त परिणाम झाला. सर्वकाही बंद होतं त्यामुळे लोकांना घरी बसण्याशिवाय पर्याय नव्हता. अशा स्थितीत पर्यटन व्यवसाय चालवत असलेल्या लोकांना मोठा फटका बसला. आता हळूहळू हॉटेल आणि रेस्टॉरंट उघडायला सुरूवात झाली आहे. लोकांना आकर्षित करण्यासाठी हॉटेल मालकांनी वेगवेगळ्या आयडिया केल्या आहेत. अलिकडेच काश्मीरमधील कोलाहोईलल स्की रिसोर्ट परिसरातील एक नवीन इग्लू कॅफे उघडण्यात आलं आहे. हा इग्लू कॅफे बर्फानं तयार झालेला असून यात बर्फापासून तयार झालेले टेबल आहेत. यावर ग्राहकांना गरम गरम जेवण वाढण्यात येतं.
First Igloo Cafe comes up in kashmir's Gulmarg pic.twitter.com/ILcL1uDIuI
— Basit Zargar (باسط) (@basiitzargar) January 27, 2021
हे इग्लू कॅफे सुमारे 15 फूट उंच आणि 26 फूट गोल आहे. भिंतीवरील कमानी दरवाजा आणि या अनोख्या कॅफेमध्ये जवळजवळ 16 अतिथींसाठी 4 टेबल्सची जागा आहे. हॉटेल मालकाने केवळ पर्यटकांना आकर्षित करण्याच्या उद्देशाने इग्लू बांधण्यास सुरुवात केली. तथापि, गुलमर्गमधील हिमवृष्टीमुळे त्यांना आणखी काम करण्यास प्रोत्साहित केले. आनंद व्यक्त करताना या कॅफेचे मालक म्हणाले की ''20 कामगारांच्या 15 दिवसांच्या मेहनतीनंतर एक चांगला कॅफे सेवेसाठी सज्ज झाला आहे.'' अरेरे! मांजरीसह खेळणं चिमुरडीला चांगलंच भारी पडलं; खेळण्याच्या नादात गमवावी लागली दृष्टी
इग्लू कॅफे सर्वसामान्यांसाठी उघडण्यात आले आहे. या कॅफेमध्ये चहा-नाश्ता आणि दुपारचे जेवण घेण्यासाठी मोठ्या संख्येने स्थानिक लोक आणि पर्यटक येत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर सोशल मीडियावरील लोक या इग्लू कॅफेबद्दल खूप उत्सुक आहेत आणि कमेंट करून बरेच प्रश्न विचारत आहेत. एका वापरकर्त्याने विचारले की, "कॅफेमध्ये तापमान काय आहे आणि मेनूमधील लोकांना काय दिले जाईल?" घटस्फोटानंतर महिलेने १४ बाळांना दिला जन्म, पोटाचा आकार बघून हैराण झाली होती दुनिया....