भारतातील असा एकमेव किल्ला ज्यात आजही राहतात हजारो लोक, एक रूपयाही देत नाही भाडे!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 14:45 IST2025-01-09T14:42:47+5:302025-01-09T14:45:04+5:30
Living Fort : आश्चर्याची बाब म्हणजे हे लोक इथे भाडं न देतात राहतात. तसेच या लोकांची परंपराही खूप अनोखी आहे.

भारतातील असा एकमेव किल्ला ज्यात आजही राहतात हजारो लोक, एक रूपयाही देत नाही भाडे!
Living Fort : भारतात अनेक वर्ष राजे-महाराजांचं शासन होतं. त्यांच्या काळात देशात अनेक किल्ले बांधण्यात आलेत. त्यातील काही किल्ले सुस्थितीत आहेत, तर काही किल्ले जीर्ण झाले आहेत. काही किल्ले भव्य होते, तर काही लहान होते. अनेक किल्ले राष्ट्रीय वारसा घोषित करण्यात आले आहेत. हे बघण्यासाठी तिकीट काढावं लागतं आणि सरकार त्यांची देखरेख करतात. पण तुम्हाला माहीत नसेल की, भारतात एक असा जुना किल्ला आहे, ज्यात हजारो लोक राहतात. आश्चर्याची बाब म्हणजे हे लोक इथे भाडं न देतात राहतात. तसेच या लोकांची परंपराही खूप अनोखी आहे. हे लोक लग्नाच्या पत्रिका वाटण्यासोबतच घराच्या भींतीवरही छापतात.
इन्स्टाग्राम यूजर शिवांगी खन्नां एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. जो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत तिनं भारतातील एकमेव अशा किल्ल्याबाबत सांगितलं ज्यात हजारो लोक भाडं न देताही राहतात. या शहराचं नाव आहे जैसलमेर असून इथेच हा किल्ला आहे. या किल्ल्याला सोनार किल्ला म्हणतात. याला भारतातील एकमेव लिव्हिंग फोर्ट म्हटलं जातं. कारण यात किल्ल्यात साधारण ४ हजार लोक राहतात.
शिवांगीनं व्हिडिओत किल्ल्याबाबत इंटरेस्टींग माहिती दिली आहे. तिनं सांगितलं की, किल्ल्यात भांग लीगल आहे. सगळ्यात आश्चर्याची बाब म्हणजे इथे राहणारे लोक त्यांच्या घराच्या बाहेर लग्नाच्या पत्रिका प्रिंट करतात. ती एका घराच्या बाहेर उभी आहे. ज्याच्या भींतीवर गणेशाचा फोटो आणि लग्नाची पूर्ण माहिती आहे. जी वाचून कुणीही लग्नाला येऊ शकतं. जैसलमेरला गोल्डन सिटीही म्हटलं जातं. जैसलमेरचा किल्ला ११५६ मध्ये रावल जैसल यांनी बांधला होता.