इशारा देऊनही पर्यटक ज्वालामुखीवर चढले; तेवढ्यात झाला उद्रेक अन्...पाहा धक्कादायक video
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2024 03:37 PM2024-08-25T15:37:49+5:302024-08-25T15:38:33+5:30
या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
Volcano Explosion : तुमच्यापैकी अनेकांनी ज्वालामुखी उद्रेकाचे व्हिडिओ पाहिले असतील. ज्वालामुखीचा उद्रेक इतके भीषण असतात की, अनेकदा यामुळे गावच्या गाव नष्ट होतात. जगभरात अनेकदा ज्वालामुखी उद्रेकाच्या घटना घडतात. इंडोनेशिया देशात जगातील सर्वात सक्रीय ज्वालामुखी आहेत. नुकताच, येथून एक व्हिडिओ समोर आला आहे, जो पाहून अनेकांच्या अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाहीत.
पर्यटकांना सक्रिय ज्वालामुखी असलेल्या परिसरात न जाण्याचा इशारा दिला जातो. पण, काही अतिउत्साही पर्यटक अशा इशाऱ्यांना न जुमानता ज्वालामुखीवर जातात. इंडोनेशियातून असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. येथील माउंट ड्युकोनो ज्वालामुखीवर काही पर्यटक चढले होते, यावेळी अचानक उद्रेक झाला. त्यामुळे पर्यटक घाबरले अन् जीव वाचवण्यासाठी उतारावरुन धावू लागले. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये हे भयानक दृश्य दिसत आहे.
NEW: Hikers run for their lives after Mount Dukono in Indonesia erupts right in front of them.
— Collin Rugg (@CollinRugg) August 24, 2024
The footage was captured by a government operated drone.
The hikers ignored warning signs that told them to stay out of the 3 kilometer ‘danger zone.’
The unauthorized hikers… pic.twitter.com/y5Rr6Rje6i
व्हिडीओमध्ये टेकडीवर चढणारे लोक दिसत आहेत, यावेळी ज्वालामुखीतून राखेचे ढग आकाशात उडू लागतात. मिळालेल्या माहितीनुसार, हा ज्वालामुखीचा उद्रेक या महिन्याच्या सुरुवातीला झाला होता. सुदैवाने या घटनेत सर्व पर्यटक थोडक्यात बचावले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, इंडोनेशियाच्या नॅशनल डिझास्टर एजन्सीच्या इशाऱ्यानंतरही पर्यटकांनी या धोकादायक भागात प्रवेश केला होता.
ज्वालामुखीपासून दूर राहण्याचा इशारा
एजन्सीने 1930 च्या दशकापासून वाढत्या ज्वालामुखी उद्रेकांच्या पार्श्वभूमीवर माउंट डुकनो ज्वालामुखीपासून दूर राहण्याचा इशारा दिला आहे. मात्र, या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करत अनेकजण या भागात येतात.