पंख तुटलेल्या फुलपाखराला महिलेने दिलं नवं जीवन, ट्रान्सप्लांटचा व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2019 11:44 AM2019-10-04T11:44:36+5:302019-10-04T11:52:30+5:30
काही लोक मुक्या जीवांच्या मदतीसाठी नेहमीच पुढे असतात. अशीच एक महिला आहे Romy McCloskey. ही महिला Insect Art ची फाउंडर आहे.
काही लोक मुक्या जीवांच्या मदतीसाठी नेहमीच पुढे असतात. अशीच एक महिला आहे Romy McCloskey. ही महिला Insect Art ची फाउंडर आहे. ती पतंगांची कीट तयार करते. नुकतंच तिने एका फुलपाखराचं ट्रान्सप्लांट केलं, ज्याचं एक पंख तुटलं होतं. अशात रोमीने केवळ फुलपाखराचं ट्रान्सप्लांटच केलं नाही तर त्याला पुन्हा उडण्याची ताकद दिली. फुलपाखराच्या ट्रान्सप्लांटचा व्हिडीओ तिने सोशल मीडियात शेअर केला आहे. लोक तिचं भरभरून कौतुक करत आहेत.
२७ सप्टेंबरला रोमीने फेसबुकवर लिहिले की, 'फुलपाखराचे पंख बदलण्याचा व्हिडीओ. कदाचित हे माझं सर्वात खराब असेल, जे मी एका जिवंत फुलपाखरावर केलं. यातून तुम्हाला बघायला मिळेल की, फुलपाखराचे पंख कसे बदलले. तुम्हालाही याची कधी गरज पडू शकते'.
रोमीने १० नोव्हेंबर २०१३ ला एक पोस्ट शेअर करून सांगितले होते की, 'जेव्हा मी एका फुलपाखराचं ट्रान्सप्लांट केलं होतं'.