Inspirational Skating Girl Video: एकच पाय असलेल्या चिमुरडीने स्केटिंग करत साऱ्यांनाच केलं थक्क

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2022 03:39 PM2022-11-08T15:39:14+5:302022-11-08T15:40:31+5:30

स्केटिंगमधील तिचे कौशल्य पाहून साऱ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला

Inspirational Skating Girl Video A girl with one leg surprised everyone by skating live | Inspirational Skating Girl Video: एकच पाय असलेल्या चिमुरडीने स्केटिंग करत साऱ्यांनाच केलं थक्क

Inspirational Skating Girl Video: एकच पाय असलेल्या चिमुरडीने स्केटिंग करत साऱ्यांनाच केलं थक्क

Next

Inspirational Skating Girl Video: अडचणींचा सामना करताना इच्छाशक्ती माणसाला धीर देते आणि असामान्य कर्तृत्व करण्यास सक्षम बनवते. प्रतिभावान लोक अनेकदा त्यांचे ध्येय साध्य करतात आणि त्यांनी अडचणींवर मात केल्यानंतर नेटिझन्स त्यांची तोंडभरून प्रशंसा करतात. अर्जेंटिनामधील नॅशनल स्केटिंग चॅम्पियनशिप दरम्यान, अशीच एक हृदयस्पर्शी क्लिप व्हायरल झाली आणि ते पाहून लोक खूप भावूक झाले. एका युजरने शेअर केलेल्या क्लिपमध्ये एक अपंग मुलगी, मायली ट्रेजो, हिला फक्त एकच पाय आहे. पण तरीही ती रिंकवर सहजतेने स्केटिंग करताना दिसली. ते पाहून प्रेक्षकांनी अक्षरश: टाळ्यांच्या कडकडाटाच जोरजोरात तिला समर्थन दिले.

मुलगी स्केटिंग करताना हात धरून तिच्या कामगिरीवर लक्ष केंद्रित करताना दिसली. तिने हा धमाकेदार पराक्रम केल्यानंतर, मुलगी तिच्या आईच्या दिशेने गेली आणि तिच्या चेहऱ्यावर स्मितहास्य दिसले. आईनेदेखील आपल्या लेकीला उराशी कवटाळून मिठी मारली. क्लिपच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, 'काहीही अशक्य नाही. मायली ट्रेजो ही अर्जेंटिनाची स्केटिंगची राष्ट्रीय चॅम्पियन आहे.'

ही क्लिप शनिवारी शेअर केल्यापासून ट्विटरवर हजारो लोकांनी पाहिली आहे. मुलीच्या प्रयत्नामुळे अनेकांना प्रेरणादेखील मिळाली आहे. एका वापरकर्त्याने 'तुम्ही सुंदर स्केटिंग करता!' दुसऱ्या युजरने लिहिले, 'ओह माय गॉड , अमेझिंग, अमेझिंग किड, ब्राव्हो.' तिसर्‍या युजरने कमेंट बॉक्समध्ये लिहिले की, 'तुम्हाला स्वत:ला प्रेरित करणे कठीण वाटत असेल, तर तुम्ही आधी हा व्हिडिओ पहा.' या कमेंट्स तुम्हाला नक्कीच तुम्हाला मुलीच्या जिद्दीला सलाम करण्यास भाग पाडतील.

Web Title: Inspirational Skating Girl Video A girl with one leg surprised everyone by skating live

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.