Video - जिद्दीला सलाम! ना हात, ना पाय... तरीही 'त्याने' गाडी चालवण्यासाठी केला भन्नाट जुगाड
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2023 03:15 PM2023-08-16T15:15:23+5:302023-08-16T15:16:37+5:30
हात पाय नसतानाही हार मानत नाहीत. असाच एक व्हिडीओ सध्या इन्स्टाग्रामवर व्हायरल होत आहे.
परिस्थितीला तोंड देण्याची ताकद माणसात असेल तर त्याला कोणीही रोखू शकत नाही. परिस्थिती कितीही कठीण असली तरी जे हार मानत नाहीत ते धैर्याने सामोरे जातात. अपघातात हात गमावल्यानंतर तोंडाने किंवा पायाने लिहिण्याची ताकद काही लोकांमध्ये असते, तर काही लोक असे असतात की ज्यांना दिसत नसताना देखील सर्व कामं स्वतः कशी करायची हे कळतं. हात पाय नसतानाही हार मानत नाहीत. असाच एक व्हिडीओ सध्या इन्स्टाग्रामवर व्हायरल होत आहे.
ishivambhati नावाच्या अकाऊंटवरून इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडिओवर सॅल्यूट असं कॅप्शन लिहिलं आहे. तक्रारींमुळे तुम्हाला घरी जाता येत नाही, परिस्थिती काहीही असो, तुम्हाला कमवावेच लागेल असंही म्हटलं आहे. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती हातगाडी चालवताना दिसत आहे. त्या व्यक्तीला दोन्ही हात-पाय नाहीत. खास डिझाइन केलेल्या चारचाकी गाडीतून तो शहरातील रस्त्यांवर फिरताना दिसतो. या वाहनाचा वापर सामान पोहोचवण्यासाठी होताना दिसतो. रस्त्यावरील अनेक गजबजलेल्या भागातून ही गाडी जाताना दिसत आहे.
या व्हिडिओला आतापर्यंत पंचवीस हजार लोकांनी लाईक केलं आहे. व्हिडीओ पाहून एकीकडे लोक थक्क झाले आहेत. त्याच वेळी, काही लोक आहेत जे या व्यक्तीच्या धैर्याचे भरभरून कौतुक करत आहेत. एका युजरने लिहिलं की, 'असे म्हणतात की ज्याचे हात पाय सुरक्षित आहेत तो काहीही करू शकतो, पण या व्यक्तीच्या हिमतीने मन जिंकलं, कोणतंही काम अशक्य नाही.' दुसऱ्या युजरने लिहिले की, 'हे भारतीय आहेत, जे कधीही हार मानत नाहीत.' एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.