Old Man running race: मान गए आजोबा... वय वर्ष १०२ पण जोश मात्र तरूणांना लाजवणारा! तुम्ही पाहिलात का Video?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2022 05:36 PM2022-09-13T17:36:08+5:302022-09-13T17:36:51+5:30
धावण्याच्या शर्यतीत आजोबांनी दाखवलेल्या जिद्दीचं सारेच कौतुक करत आहेत
Old Man running race Viral Video: सोशल मीडियावर रोज वेगवेगळ्या व्हिडीओ व्हायरल होत असतात. या व्हिडीओज कधी काही शिकवून जातात, तर कधी कधी निखळ मनोरंजन करून जातात. काही व्हिडीओ तर तुमचा उत्साह वाढवतात. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. तरूणांनाही लाजवेल असा एक पराक्रम शंभरी पार केलेल्या (१०२ वर्षांच्या) आजोबांनी केल्याचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडिओमधील एका वयस्कर आजोबांनी आपल्या स्टाईलने सर्वांना आश्चर्यचकित केले असून हा व्हिडिओ साऱ्यांच्याच पसंतीस पडत आहे. (Trending on Social Media)
या व्हिडिओमध्ये एका वृद्ध व्यक्तीने एका धावण्याच्या शर्यतीत सहभाग घेतला आहे. तो तेथेच थांबलेला नाही, तर त्याने ती शर्यत पूर्णही करून दाखवली आहे. या आजोबांना पाहून मैदानात उपस्थित सर्व लोक त्यांच्या जिद्दीचे व धाडसाचे कौतुक करताना दिसतात आणि टाळ्यांचा प्रचंड कडकडाट करताना दिसतात. हा व्हिडीओ जरी जुना असला तरी त्यातील आजोबांची जिद्द तुम्हाला नक्कीच प्रेरणा देईल. तुम्हीही सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा Video पाहा-
“Never put an age limit on your dreams.”
— Vala Afshar (@ValaAfshar) September 5, 2022
This man was born in 1917, running a race at age 102 pic.twitter.com/cvabjbcOXb
आजोबांचा हा प्रेरणादायी व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. ४१ सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये प्रत्येकजण या वृद्ध आजोबांच्या पुढे निघून जाताना दिसत आहे. पण लोकांचं लक्ष शर्यतीत जिंकलेल्या स्पर्धकांकडे नसून या आजोबांकडे असतं. या शर्यतीत आजोबा शेवटच्या क्रमांकावर पोहोचले असले तरी त्यांच्या जिद्दीचे साऱ्यांनाच कौतुक असल्याचे दिसून येते.