International Women's Day : कडक सॅल्यूट! महिलांना कमजोर समजणाऱ्यांना सणसणीत चपराक; व्हिडीओ पाहून तुम्हीही कराल कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2021 02:09 PM2021-03-08T14:09:58+5:302021-03-08T14:58:14+5:30
International Women's Day : जे लोक महिलांना कमकुवत समजतात अशी माणसं स्वतः कमकुवत मानसिकतेची असतात. असा आशय या व्हिडीओतून मिळत आहे.
आपण नेहमीच पाहत असाल की, समाजात असे अनेक लोक असतात जे महिलांना कमजोर समजतात. महिलांपेक्षा आपणच वरचड आहोत असं त्यांना वाटत असतं. आज जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं (International Women's Day) महिलांच्या कर्तृत्वाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. जे लोक महिलांना कमकुवत समजतात अशी माणसं स्वतः कमकुवत मानसिकतेची असतात. असा आशय या व्हिडीओतून मिळत आहे.
Naga women Battalion lifting a Mahindra Bolero from the side drain! An old video which needs to be seen by more people. @anandmahindra @manoj_naandi @KirenRijiju @AmitShah @smritiirani pic.twitter.com/XivppAcGBi
— Mmhonlumo Kikon (@MmhonlumoKikon) August 27, 2019
हा व्हिडीओ नागालँडचा असल्याची माहिती समोर आली आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता या महिला चिखलात अडकलेली गाडी बाहेर काढण्यासाठी प्रयत्नांची पाराकाष्ठा करत आहेत. मोठीच्या मोठी जीप उचलून या महिला बाजूला सरवकत आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठया प्रमाणावर व्हायरल होत असून युनिफॉर्मवर असलेल्या या महिलांवर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. बाबो! अचानक सापडला मोठाच्या मोठा सोन्याचा डोंगर; लोकांची सोनं लुटण्यासाठी तुफान गर्दी, पाहा व्हायरल व्हिडीओ
आतापर्यंत ३ लाखांपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून १८ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलं आहे. ५ हजारांपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ रिट्विट केला आहे. २३ सेकांदाच्या या व्हिडीओनं सगळ्याचंच लक्ष वेधून घेतलं आहे. थरारक! फॅन नसतानाही बाथरूमधून यायची हवा; तरूणीनं आतला आरसा बाजूला सरकवताच समोर आलं असं काही....