१ वर्षापूर्वी नदीत पडला होता iPhone; सुकलेल्या नदीत सापडला; चार्जिंग करताच पुन्हा झाला सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2021 05:46 PM2021-04-09T17:46:09+5:302021-04-09T17:59:45+5:30
iphone had fallen in the lake : आयफोन मिळाला तेव्हा पूर्णपणे चिखलात माखलेला होता. एक वर्ष पाण्यात राहूनही त्याच्या वॉटरप्रुफ कव्हरमुळे त्याला काहीही झालं नाही.
सध्या कोणत्याही व्यक्तीला आपल्या जीवापेक्षा फोन जास्त महत्वाचा असतो. कारण माणसं जास्तीत जास्तवेळ मोबाईल वापरतात. तैवान आतापर्यंतच्या सर्वात वाईट दुष्काळाशी झुंज देत आहे. पण या दुष्काळातही एका माणसाच्या आयुष्यात आनंद निर्माण झाला आहे, तोही त्याचा हरवलेला आयफोन साडपल्यामुळे. चेन नावाच्या माणसाला पुन्हा आपला आयफोन परत मिळाला. तैवानच्या एका सर्वात महत्त्वाच्या तलावात एक वर्षापूर्वी हा फोन पडला. आता पावसाच्या अभावामुळे नदीचे पाणी कोरडे पडले.
चेनने रविवारी व्हायरल झालेल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की गेल्या वर्षी सन मून लेक येथे पॅडलबोर्डिंग करताना त्याने आपला आयफोन पडला होता. तायवान वृत्तसंस्थेनं दिलेल्य माहितीनुसार या तलावाचे रूपांतर एका जमीनीत झालं आहे. कारण सगळी बेटं चिखलानं भरलेली आहेत.
मूनलेकमध्ये पाण्याचा स्तर पूर्णपणे कमी झाल्यानंतर या माणसाचा हरवलेला आयफोन मिळाला आहे. चेननं दिलेल्या माहितीनुसार हरवलेला मोबाईल मिळाल्यामुळे तो खूपच खुश आहे. हा आयफोन मिळाला तेव्हा पूर्णपणे चिखलात माखलेला होता. एक वर्ष पाण्यात राहूनही त्याच्या वॉटरप्रुफ कव्हरमुळे त्याला काहीही झालं नाही. नोकरीवरून काढलं; म्हणून त्यानं वचपा काढण्यासाठी सुपरमार्केटवर चालवली कार
चेन म्हणाले की, ''चार्जिंगनंतर फोनने उत्तम प्रकारे काम केले. आयफोन चार्ज केल्यावर पुन्हा काम सुरू झाल्याचे दर्शविण्यासाठी मी फेसबुक ग्रुपवर फोटो शेअर केले.'' दरम्यान, या फेसबुक पोस्टवर 25 हजाराहून अधिक लाईक्स आणि शेकडो कमेंट्स आल्या आहेत. सोशल डिस्टेंसिंगपासून वाचण्यासाठी पठ्ठ्यानं शोधला जुगाड; फोटो पाहून आनंद महिंद्रा म्हणाले..