iPhone ने वाचवला इस्रायली सैनिकाचा जीव, 'रजनीकांत स्टाईल'मध्ये रोखली बुलेट
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2023 06:26 PM2023-12-21T18:26:52+5:302023-12-21T18:27:29+5:30
iPhone Stop Bullet: पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी स्वतः त्या सैनिकाची भेट घेऊन नवीन आयफोन गिफ्ट केला.
iPhone Stop Bullet: महागड्या स्मार्टफोन्समध्ये Apple iPhone ची गणना केली जाते. आयफोनमध्ये असे अनेक फीचर्स आहेत, ज्यामुळे या फोनची किंमत जास्त आहे. धूळ आणि वॉटरप्रुफ असण्यासोबतच iPhone अत्यंत गरम किंवा थंड तापमानातही काम करू शकतो. यातच आता हा फोन बुलेटप्रूफ असल्याचे सिद्ध झाले आहे. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण, या iPhone मुळे एका इस्रायली सैनिकाचे प्राण वाचवले आहेत.
His phone literally STOPPED a bullet & saved his life.
— Living Lchaim (@LivingLchaim) December 19, 2023
So Prime Minister Benjamin Netanyahu (@netanyahu) & Shai Graucher went to gift him with a new one.
“You are our heroes and together we will win"
Many iPhones and iPads donated by the Book and Schottenstein Families ♥️ pic.twitter.com/FN2epHGbAa
iPhone मुळे एका जवानाच्या शरीरात गोळी जाण्यापासून रोखली गेली आहे. यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी त्या सैनिकाची भेट घेऊन त्याला नवीन आयफोन दिला. त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर शेअर केला जातोय. विशेष म्हणजे, आयफोनने एखाद्याचा जीव वाचवण्याची ही पहिलीच वेळ नाही.
यापूर्वीही असे घडले आहे
बेंजामिन नेतन्याहू यांचा एक व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर व्हायरल होतोय, ज्यामध्ये ते सैनिकाला भेटण्यासाठी रुग्णालयात पोहोचल्याचे दिसत आहेत. यावेळी त्यांनी गोळी लागलेल्या आयफोनची पाहणी केली आणि त्यानंतर सैनिकाला नवीन आयफोनही दिला. आयफोनमुळे त्या जवानाला कोणतीही इजा झाली नाही.