IPS अधिकाऱ्यानं शेअर केला वृद्ध आई अन् मुलाचा डोळ्यात पाणी आणणार व्हिडिओ, एकदा पाहाच..
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2022 16:13 IST2022-02-09T16:12:05+5:302022-02-09T16:13:23+5:30
आयपीएस अधिकारी आणि छत्तीसगढचे जनसंपर्क व परिवहन आयुक्त दीपांशु काबरा यांनी एका वृद्ध आई आणि तिच्या मुलाचा एक मनाला स्पर्शून जाणारा व्हिडिओ ट्विट केला आहे.

IPS अधिकाऱ्यानं शेअर केला वृद्ध आई अन् मुलाचा डोळ्यात पाणी आणणार व्हिडिओ, एकदा पाहाच..
रायपूर-
आयपीएस अधिकारी आणि छत्तीसगढचे जनसंपर्क व परिवहन आयुक्त दीपांशु काबरा यांनी एका वृद्ध आई आणि तिच्या मुलाचा एक मनाला स्पर्शून जाणारा व्हिडिओ ट्विट केला आहे. आईवरच्या प्रेमापोटी लेकरू व्यक्त करत असलेली काळजी पाहून व्हिडिओवर लाइक्स आणि शेअर्सचा पाऊस पडला आहे.
''बेटा हो तो ऐसा... खुशी होती है देखकर की श्रवण कुमार जैसे पुत्र आज भी हैं...काश हर घर में ऐसे बेटे हों ताकी समाज को कभी वृ्द्धाश्रमों की जरुरत ना पडे", असं कॅप्शन देत दीपांशु यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.
बेटा हो तो ऐसा...
— Dipanshu Kabra (@ipskabra) February 8, 2022
ख़ुशी होती है देखकर कि श्रवण कुमार जैसे पुत्र आज भी हैं...
काश हर घर में ऐसे बेटे हों ताकि समाज को कभी वृद्धाश्रमों की ज़रुरत ना पड़े. pic.twitter.com/iUugis5p9C
ट्विटरवर या व्हिडिओवर अनेकांनी खूप चांगल्या प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. भारतातील प्रत्येक घरात असेच श्रवणकुमार नक्कीच आहेत, असं एका युझरनं म्हटलं आहे. तर मुकेश पांडे या युझरनं मुलं अशीच असतात फक्त लग्न झालं की त्यांची पत्नी त्यांच्यात बदल घडवते असं म्हटलं आहे. सर्वांना आई-वडील खूप जवळचे असतात. पण सासू-सासऱ्यांवर कमी प्रेम असतं. ज्यादिवशी सासू-सासऱ्यांनाही आई-वडीलांप्रमाणे प्रेम दिलं जाईल त्यावेळी देशातील सर्व मुलं श्रवण कुमारसारखी असतील, असंही पांडे यांनी म्हटलं आहे.