Irfan Pathan, Mystry Girl: स्टेडियममधील 'मिस्ट्री गर्ल'ना व्हायरल करणारा सापडला... पाहा इरफान पठाणचा Video

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2022 01:21 PM2022-11-14T13:21:50+5:302022-11-14T13:22:27+5:30

मॅच सुरू असताना बरेच फॅन्स व्हायरल होतात, त्यात बहुतेक वेळा मुलींची संख्या जास्त असते.

Irfan Pathan finally finds cameraman who captures beautiful girls in stadium mystery girls in camera viral video T20 World Cup 2022 ENG vs PAK | Irfan Pathan, Mystry Girl: स्टेडियममधील 'मिस्ट्री गर्ल'ना व्हायरल करणारा सापडला... पाहा इरफान पठाणचा Video

Irfan Pathan, Mystry Girl: स्टेडियममधील 'मिस्ट्री गर्ल'ना व्हायरल करणारा सापडला... पाहा इरफान पठाणचा Video

Next

Irfan Pathan, Mystery Girl: T20 World Cup 2022 च्या अंतिम सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानचा पाच गडी राखून पराभव केला आणि दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावले. बेन स्टोक्स या सामन्यात इंग्लिश संघाच्या विजयाचा हिरो ठरला. त्याने नाबाद ५२ धावांची खेळी करत इंग्लंडला दुसऱ्यांदा विश्वविजेतेपद मिळवून दिले. हा अंतिम सामना संपल्यानंतर भारतीय समालोचकांनाही काहीशी विश्रांती मिळाली. संपूर्ण विश्वचषकात भारतीय समालोचक मैदानावर बरीच पळापळ करताना दिसले होते. या संपूर्ण विश्वचषकादरम्यान अनेक मजेशीर क्षण पाहायला मिळाले. यासोबतच स्टेडियममधील अनेक सुंदर मुलीदेखील कॅमेराच्या नजेरेतून घरात बसलेल्या प्रेक्षकांना दिसल्या. स्टेडियममधील फॅन्सना आणि विशेषत: 'मिस्ट्री गर्ल्स'ना व्हायरल करणारा माणूस अखेर भारतीय माजी क्रिकेटर आणि समालोचक इरफान पठाणने शोधून काढला.

इंग्लंडच्या विजयानंतर इरफान पठाणने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला. त्यामध्ये तो कॅमेरामनसोबत दिसला. या व्हिडिओमध्ये पठाणने खुलासा केला आहे की तोच कॅमेरामन आहे जो फॅन्सना व्हायरल करतो. पठाण या व्हिडिओमध्ये म्हणाला, 'हा तोच माणूस आहे जो लोकांना व्हायरल करतो आणि त्यातही हा काही 'खास' लोकांना व्हायरल करतो'

इरफानने आपल्या पोस्टमध्ये त्या कॅमेरामनचे नावही लिहिले आहे. प्रसन्न प्रधान असे त्याचे नाव आहे. त्याचवेळी, या व्हिडीओमध्ये कॅमेरामन प्रसन्नही मजेशीर पद्धतीने हसत-हसत म्हणाला की 'त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका.' सध्या हा व्हिडीओ चाहत्यांना चांगलाच आवडला आहे.

दरम्यान, अंतिम सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने २० षटकात १३७ धावा केल्या. इंग्लंडच्या गोलंदाजांनी शिस्तबद्ध मारा करत पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्या. त्यानंतर इंग्लंडसमोर १३८ धावांचे माफक आव्हान होते. पाकिस्तानच्या वेगवान माऱ्यापुढे इंग्लिश फलंदाजांची चांगलीच त्रेधातिरपिट उडाली. पण बेन स्टोक्सने संयमी खेळ करत शेवटपर्यंत मैदानात पाय रोवले आणि अखेर मोक्याच्या क्षणी फटकेबाजी करत संघाला विश्वविजेता केले.

Web Title: Irfan Pathan finally finds cameraman who captures beautiful girls in stadium mystery girls in camera viral video T20 World Cup 2022 ENG vs PAK

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.