टाईम ट्रॅव्हल शक्य आहे? 85 वर्षे जुन्या व्हिडीओत मोबाईलवर बोलताना दिसली महिला, पाहा...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2023 07:41 PM2023-10-01T19:41:20+5:302023-10-01T19:43:00+5:30
1938 साली शूट करण्यात आलेल्या व्हिडिओत महिला मोबाईलवर बोलताना दिसली. हा जुना व्हिडिओ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
Trending News: आज विज्ञान-तंत्रज्ञानाच्या बाबतीत जग खूप पुढे गेले आहे. पण, आजही काही गोष्टी वैज्ञानिक आकलनाच्या पलीकडे आहेत. शास्त्रज्ञही अशा अनेक गोष्टींना चमत्कार म्हणतात. यामध्ये एलियन, यूएफओ, टाइम ट्रॅव्हल आणि टाइम मशीन यांसारख्या गोष्टींचा समावेश आहे. या अशा गोष्टी आहेत, ज्यांचे रहस्य सोडवण्याचा शास्त्रज्ञ अनेक वर्षांपासून प्रयत्न करत आहेत, परंतु आजपर्यंत त्यांना यश आले नाही. टाइम ट्रॅव्हलशी संबंधित एक जुना व्हिडिओ पुन्हा चर्चेत आला आहे.
या व्हिडिओमध्ये एक महिला मोबाईलवर बोलताना दिसत आहे. तुम्ही म्हणाल यात नवीन काय? आजकाल सगळेच मोबाईलवर बोलतात. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की, हा व्हिडीओ 85 वर्षांपूर्वी(1938 साली) शूट करण्यात आला होता. त्यावेळी मोबाईल फोन अस्तित्वात नव्हते. 1973 मध्ये मार्टिन कूपरने मोबाईल फोनचा शोध लावला. आता प्रश्न पडतो की 1973 मध्ये पहिला मोबाईल फोन आला होता, मग 1938 मध्ये महिला मोबाईलवर बोलताना कशी दिसली?
टाईम ट्रॅव्हल...?
डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, 1938 मध्ये शूट केलेला हा व्हिडिओ टाइम ट्रॅव्हलचा पक्का पुरावा मानला जातो. व्हिडिओमध्ये तुम्हीदेखील पाहू शकता की, अनेक महिलांमध्ये एक महिला कानाजवळ उपकरण ठेवून बोलत आहे. तिच्या हातात मोबाईलसारखे काहीतरी दिसत आहे. तिच्याकडे बघून ती मोबाईलवर कुणाशी तरी बोलत असल्याचा भास होतो.
व्हिडिओ तुम्हाला विचार करायला लावेल
'टाइम ट्रॅव्हल'चा हा व्हिडिओ 2013 मध्ये जॉन्स वेकी वर्ल्ड न्यूज नावाच्या आयडीने यूट्यूबवर शेअर करण्यात आला होता, ज्यामध्ये असे सांगण्यात आले होते की, 'हा व्हिडिओ 1938 मध्ये मॅसेना न्यूयॉर्कच्या अमेरिकन प्लांटच्या कार्यालयात चित्रित करण्यात आला आहे.' आता हा खरचं टाईम ट्रॅव्हलचा प्रकार आहे की, अजून काही, याबाबत ठोस कुठलीही माहिती मिळू शकलेली नाही.