Viral Photo: या फोटोत माणूस आहे की कुत्रा? फोटो पाहून लोक झाले कन्फ्यूज...तुम्हाला काय दिसतंय?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2021 10:15 AM2021-02-06T10:15:59+5:302021-02-06T10:21:42+5:30
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा ऑप्टिकल इल्यूजनचा फोटो पाहून यूजर्स हैराण झाले आहेत. कारण त्यांना यात मनुष्य आहे की कुत्रा हे समजत नाहीये. बघा तुम्हाला काय दिसतंय....
अनेकदा असं होतं की, पहिल्यांदा आपण एखादी गोष्ट बघतो ती मुळात तशी नसतेच. तो आपल्या नजरेचा धोका असतो. याला ऑप्टिकल इल्यूजन असं म्हणतात. ऑप्टिकल इल्यूजनचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असाच एक फोटो सध्या सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.
सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत असून ज्याकडे पाहून तुम्ही पहिल्यांदा कन्फ्यूज व्हाल. या फोटोकडे पाहून हे ठरवणं अवघड होतं की, यात जंगलाकडे धावत जाणारा मनुष्य आहे की एक कुत्रा आहे जो जंगलातून बाहेर येतो. (हे पण बघा : आबरा का डाबरा! 'या' फोटोत लपली आहे एक जंगली मांजर, लोक शोधून शोधून थकले; बघा तुम्हाला तरी दिसते का....)
तुम्हाला काय दिसतंय?
या फोटोकडे पाहिल्यांवर असं दिसतं की, एक मनुष्य जंगलाकडे धावत जात आहे आणि पाठीवर लाकडं आहेत. इथेच भ्रम निर्माण होतो. पण हा भ्रम तुम्हाला पहिल्यांदा फोटो पाहिल्यावर होतो. पण हा भ्रम तेव्हा होतो जेव्हा अचानक हा फोटो बघाल. पण जेव्हा तुम्ही हा फोटो निरखून बघाल तर तुमच्या लक्षात येईल की, हा तर नजरेचा धोका आहे. मुळात हा एक काळ्या रंगाचा कुत्रा आहे जो बर्फातून निघून कॅमेराकडे धावत येत आहे.
सोशल मीडियावरील हा फोटो पाहून लोक हैराण झाले आहेत आणि कन्फ्यूज झाले आहेत. लोकांना प्रश्न पडला आहे की, यात मनुष्य आहे की कुत्रा आहे. यूजर्स हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. हा फोटो सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत आणि हे असं कसं असा त्यांना प्रश्न पडत आहे. (हे पण वाचा : 'या' फोटोमधील बदकांची संख्या आहे तरी किती? व्हायरल होतोय बदकांचा फोटो, बघा तुम्हाला जमतंय का... )
असं का होतं?
जेव्हा तुम्ही एखाद्या वस्तूकडे किंवा फोटोकडे बघता तेव्हा पहिल्या नजरेला जे आहे ते दिसत नाही तर वेगळं काही दिसतं. त्याचा भ्रम असं म्हणतात. जास्तकरून असं रात्रीच्या अंधारात होतं. पण आजकाल सोशल मीडियावर असे अनेक फोटो व्हायरल होतात.