देखो ये जिंदा हैं! अनेक महिन्यांनी जगासमोर आलेल्या जॅक मांवर भन्नाट मीम्स!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2021 04:06 PM2021-01-20T16:06:35+5:302021-01-20T16:18:07+5:30

चीनच्या सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सने त्यांचा एक व्हिडीओ शेअर केलाय. ज्यात मा हे सांगत आहे की, 'जेव्हा कोरोना व्हायरस नष्ट होईल तेव्हा आपण सगळेच पुन्हा भेटू'. 

Jack Ma reappearance after several months funny memes shared on social media | देखो ये जिंदा हैं! अनेक महिन्यांनी जगासमोर आलेल्या जॅक मांवर भन्नाट मीम्स!

देखो ये जिंदा हैं! अनेक महिन्यांनी जगासमोर आलेल्या जॅक मांवर भन्नाट मीम्स!

Next

चीनची मोठी कंपनी अलीबाबाचे संस्थापक जॅक मा गेल्या तीन महिन्यांपासून बेपत्ता होते. आज बुधवारी(२० जानेवारी) ला ते अचानक समोर आले. त्यांना एका व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये भाग घेताना बघण्यात आलं. जगभरातून झालेली टीका आणि दबावामुळे चीनच्या सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सने त्यांचा एक व्हिडीओ शेअर केलाय. ज्यात मा हे सांगत आहे की, 'जेव्हा कोरोना व्हायरस नष्ट होईल तेव्हा आपण सगळेच पुन्हा भेटू'. 

चीनचे लोकप्रिय उद्योजक जॅक मा यांनी बुधवारी एका वार्षिक कार्यक्रमात ग्रामीण शिक्षकांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे संबोधित केलं. ऑनलाइन प्रसारित होणाऱ्या या कार्यक्रमात मा यांनी चर्चा केली की, कशा प्रकारे अधिक दान केलं जावं. पण यादरम्यान त्यांनी त्यांच्या लाइव्ह लोकेशनचा उल्लेख केला नाही.

ग्लोबल टाइम्सच्या चीफ रिपोर्टर किंगक्विंग शेन यांनी ट्विट केलं की, 'जॅक मा बेपत्ता नाहीत. त्यांनी बुधवारी सकाळी १०० ग्रामीण शिक्षकांसोबत कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला आणि म्हणाले की, कोरोना व्हायरस नष्ट झाल्यावर ते पुन्हा भेटतील'.

तेच अचानक जॅक मा इतक्या महिन्यांनी जगासमोर आल्याने सोशल मीडियावर धमाका झालाय. सोशल मीडियावरील लोक ते असे अचानक समोर आल्याने हैराण झाले आणि फनी मीम्स शेअर करत आहेत.

दरम्यान, नेहमीच वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये आणि मीडियाच्या चर्चेत राहणारे जॅक मा अखेरचे गेल्यावर्षी २५ ऑक्टोबरला शांघाय सम्मेलनात दिसले होते. यावेळी त्यांनी चीनच्या आर्थिक धोरणांवर टीका केली होती. त्यामुळे अफवा पसरली होती की चीन सरकार अलीबाबाचं नियंत्रण आपल्या हाती घेऊ शकते. ते तीन महिन्यांपासून गायब असल्याने ही अफवा अधिक बळकट बनली होती. 

Web Title: Jack Ma reappearance after several months funny memes shared on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.