धक्कादायक! रील बनवण्याच्या नादात रेल्वे रुळावर स्टंट; पाठीमागून आली ट्रेन अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2024 12:30 PM2024-11-12T12:30:11+5:302024-11-12T12:30:34+5:30
एक तरुण थार घेऊन रील काढत रेल्वे रुळावर गेला. नशेत असलेल्या तरुणाने रेल्वे रुळावरून गाडी नेण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांची थार रेल्वे रुळांमध्ये अडकली.
आजची तरुणाई सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी काहीही करायला तयार आहे. सोशल मीडियावर तरुणांच्या विचित्र गोष्टी दररोज व्हायरल होत असतात. राजधानी जयपूरच्या हरमदा पोलीस स्टेशन परिसरातून अशीच एक घटना समोर आली आहे. एक तरुण थार घेऊन रील काढत रेल्वे रुळावर गेला. नशेत असलेल्या तरुणाने रेल्वे रुळावरून गाडी नेण्याचा प्रयत्न केला. त्याची थार रेल्वे रुळांमध्ये अडकली.
यावेळी रेल्वे रुळावर एक मालगाडी आली पण लोको पायलटने प्रसंगावधान दाखवत मालगाडी वेळेत थांबवली. त्यामुळे थोडक्यात मोठी दुर्घटना टळली. पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक करून तपास सुरू केला आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हरमदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत रील काढत असताना मद्यधुंद थार चालकाने रेल्वे रुळावरून वाहन नेण्याचा प्रयत्न केला मात्र वाहन रेल्वे रुळाच्या मध्यभागी अडकले. मद्यधुंद अवस्थेत असल्याने गाडीवरील पूर्ण नियंत्रण सुटलं होतं. यावेळी मालगाडीच्या लोको पायलटने प्रसंगावधान दाखवत मालगाडी वेळेत थांबवली. त्यानंतर लोकांच्या मदतीने सुमारे १५ मिनिटांच्या अथक परिश्रमानंतर थार रेल्वे रुळावरून बाहेर काढण्यात आली.
रेल्वे रुळावरून थार बाहेर आल्यानंतर आरोपीने तेथून पळ काढला. मुंडीया रामसरकडे जात असताना वाटेत त्याने दोन-तीन जणांनाही धडक दिली. स्थानिक पोलीस आणि आरपीएफला या प्रकरणाची माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहोचले. त्यांनी कारचा पाठलाग करून आरोपी चालकाला पकडलं. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. आरोपींवर कडक कारवाई केली जाईल, असं पोलिसांनी म्हटलं आहे.