एक असं कॉलेज जिथे हेलमेट घालून शिक्षण घेतात विद्यार्थी, जाणून घ्या कारण...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2024 02:02 PM2024-03-12T14:02:09+5:302024-03-12T14:03:17+5:30
हा एक कोणता यूनिक ड्रेस कोड नाही. यामागे एक खास कारण आहे. यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
भारतात तुम्हाला वेगवेगळे कॉलेज बघायला मिळतात. लोक त्यांच्यानुसार तिथे अॅडमिशन घेतात. बरेच लोक सरकारी कॉलेजमध्ये शिकतात. कारण तिथे खर्च कमी येतो. दुसरीकडे खाजगी कॉलेजमध्ये सुविधा तर खूप असतात, पण इथे फी जास्त असते. अशात जमशेदपूरमधील एका कॉलेजचा एक वेगळाच किस्सा समोर आला आहे.
येथील वर्कर कॉलेजमध्ये शिकायला येणाऱ्या विद्यार्थ्यांना हेलमेट घालून क्लासमध्ये बसावं लागतं. हा एक कोणता यूनिक ड्रेस कोड नाही. यामागे एक खास कारण आहे. यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
काय आहे कारण?
क्लासमध्ये हेलमेट घालून बसणारे विद्यार्थी हतबल आहेत. या कॉलेजची इमारत जुनी झाली आहे. स्थिती इतकी खराब आहे की, छत कधीही पडू शकतं. अशात विद्यार्थी आपल्या सुरक्षेसाठी क्लासमध्ये हेलमेट घालून बसतात.
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर कॉलेजच्या प्रिंसिपलसोबत बोलणं झालं तर त्यांनीही हात वर केले. ते म्हणाले की, ही इमारत बनून 70 पेक्षा जास्त वर्ष झाले आहेत. त्यांनी अनेकदा अधिकाऱ्यांनी याबाबत सांगितलं. पण कुणीही काही केलं नाही. अशात त्यांनी शिक्षण याच स्थितीत सुरू ठेवण्याशिवाय पर्याय नाही.