Janmashtami Video: ही मातीची हंडी की लोखंडाची..? गोविंदा थकले पण हंडी काही फुटेना; पहा Video...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2022 03:13 PM2022-08-21T15:13:24+5:302022-08-21T15:15:05+5:30
Janmashtami Viral Video: कृष्ण जन्माष्टमीला हदी हंडीचे आयोजन केले जाते, याचाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय.
Janmashtami Viral Video: भारतात कृष्ण जन्माष्टमी मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. जन्माष्टमीच्या पार्श्वभूमीवर दही-हंडीचा एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय. दही-हंडीमध्ये एकावर एक थर चढवून गोविंदा मटकी फोडतात, पण व्हायरल व्हिडिओमध्ये याच्या उलट झालेलं पाहायला मिळत आहे.
मातीची की लोखंडाची हंडी?
व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये दही-हंडी फोडतानाचे दृष्य दिसत आहेत, यात एक व्यक्ती नारळाने हंडी फोडण्याचा प्रयत्न करतोय. पण, या व्यक्तीकडून हंडी काही केल्या फुटत नाही, यानंतर दुसरा एक व्यक्ती येतो पण त्याच्याकडूनही हंडी फुटत नाही. कितीही नारळ मारले तरीदेखील हंडी न फुटल्याने उपस्थित सर्वच लोक चकीत होतात.
व्हिडिओ व्हायरल:-
पूरा गांव मटकी बनाने वाले कुमार को ढूंढ रहा है😂🙏 pic.twitter.com/nwTCLLQTUd
— sweetBhartiiye (@chatterchatru) August 19, 2022
लाख प्रयत्न करूनही दहीहंडी फुटत नाही. हा व्हिडीओ पाहून अनेकांना हसू आवरता नाहीये. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. आत्तापर्यंत 13 हजाराहून अधिक वेळा हा व्हिडिओ पाहिला गेला आहे. इतकंच नाही तर 30 सेकंदांच्या या व्हिडिओला अनेकांनी लाईक आणि रिट्विट केले आहे. कमेंट सेक्शनमध्ये लोक मजेशीर प्रतिक्रिया देताना दिसले.