नववर्षाला जपानच्या आनंदावर विरजण; अंगावर शहारे आणणारा भूकंपाचा 'VIDEO' व्हायरल 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2024 01:06 PM2024-01-02T13:06:53+5:302024-01-02T13:09:46+5:30

भूकंप, त्सुमानीने जपान हादरलं, काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.

Japan new year tsunami earthquake ishikawa kanazawa railway station video goes viral on social media  | नववर्षाला जपानच्या आनंदावर विरजण; अंगावर शहारे आणणारा भूकंपाचा 'VIDEO' व्हायरल 

नववर्षाला जपानच्या आनंदावर विरजण; अंगावर शहारे आणणारा भूकंपाचा 'VIDEO' व्हायरल 

Japan Earthquake & Tsunami Video: उगवत्या सूर्याचा देश म्हणून जपानकडे पाहिलं जातं. पण नवीन वर्षाच्या पूर्वसंधेला हा देश भूकंपाच्या धक्क्याने हादरला. जवळपास ७.६ रिश्टर स्केल इतकी या भूकंपाची तीव्रता मोजण्यात आली. तसंच थोडेथोडके नाही तर तब्बल २१ वेळा हा भूकंप झाला. राजधानी टोकियो आणि कांटो या भागांना भूकंपाचे धक्के जाणवल्याचे वृत्त द जपान टाइम्सने दिले आहे. एवढं कमी होतं की काय त्यात त्सुनामीने सगळं निस्तानाबूत केलं.
 
दरम्यान, जपानमधील अंगाचा थरकाप उडवणारा एक व्हिडीओ नुकताच समोर आला आहे. हा व्हायरल व्हिडीओ पाहून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. जपानच्या इशिकावा शहरातील कनाकावा रेल्वे स्थानकातील काळजाचा थरकाप उडणारा हा व्हिडीओ आहे. 

जपानमधील भूकंपातील भीषण स्थितीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. यामध्ये भूकंपाचे धक्के जाणवताना रेल्वे स्थानकात घडणाऱ्या घटनेचा व्हिडीओ सीसीटीव्हीत कैद करण्यात आला आहे. भूकंपानंतर जपानमधील समुद्रकिनाऱ्यावर त्सूनामी धडकली आणि सारं काही उद्धवस्त झालं. जपानमध्ये भूकंपानं कसा हाहाकार माजवला आहे, याचा अंगावर शहारे आणणारे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. 

या व्हायरल व्हिडिओमध्ये भूकंपामुळे कनाकावा रेल्वे स्थानकावरील सूचना फलक अक्षरश: पाला-पाचोळ्यासारखा उडताना दिसतोय. रेल्वे स्थानकासह तेथील  सगळ्या वस्तू सहज वाऱ्याची झुळूक यावी आणि कोसळाव्यात त्या प्रमाणे हे सगळं घडतंय.दरम्यान, त्या रेल्वे स्थानकावर एक प्रवासी देखील असल्याचं पाहायला मिळतंय. या चित्तथरारक घटनेवेळी तेथे असलेला व्यक्ती प्रचंड घाबरल्याचे दिसत आहे.

जपानमधील भूकंपाची तीव्रता इतकी होती की अनेक मेट्रो आणि रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या. भूकंपाचे धक्के जाणवताच त्या-त्या ठिकाणावरील वीजपुरवठा बंद करण्यात आला आहे. या व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया केल्या आहेत. जपानमधील लोक सुरक्षित असावेत अशी आशयाची कमेंट्स देखील काहींनी केली आहे. 

पाहा व्हिडीओ -

Web Title: Japan new year tsunami earthquake ishikawa kanazawa railway station video goes viral on social media 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.