VIDEO : जपानी लोकांनी पहिल्यांदाच घेतली हाजमोलाची टेस्ट, हावभाव बघून हसतच सुटाल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2024 11:09 IST2024-11-28T11:08:30+5:302024-11-28T11:09:34+5:30
Viral Video : सोशल मीडियावर एका जपानी इन्फ्लुएन्सरचा एक रील व्हायरल झाला आहे. ज्यात काही जपानी लोक हाजमोलाची पहिल्यांदाच टेस्ट घेताना दिसत आहेत.

VIDEO : जपानी लोकांनी पहिल्यांदाच घेतली हाजमोलाची टेस्ट, हावभाव बघून हसतच सुटाल!
Viral Video : हाजमोलाचं नाव जरी काढलं तरी तोंडाला पाणी सुटतं. याची झटका देणारी टेस्ट लोकांना आवडते. भारतात हाजमोला माहीत नसेल अशी व्यक्ती क्वचितच सापडेल. जेवण पचवण्यासाठी भरपूर लोक हाजमोला खातात. तसेच याने पचनासंबंधी अनेक समस्याही दूर होतात. भारतात तर लोकांना याची टेस्ट माहीत आहे. पण परदेशातील लोकांसाठी याची पहिल्यांदा टेस्ट घेणं एक वेगळा अनुभव ठरतो. सोशल मीडियावर एका जपानी इन्फ्लुएन्सरचं एक रील व्हायरल झाला आहे. ज्यात काही जपानी लोक हाजमोलाची पहिल्यांदाच टेस्ट घेताना दिसत आहेत. त्यानंतरचे त्यांचे हावभावही बघण्यासारखे आहेत. जे बघून नक्कीच कुणालाही हसू येईल.
एक तरूण जपानमधील लोकांना हाजमोला देत आहे. पहिल्यांदाच हाजमोला खाऊन जपानमधील लोकांना अशा काही प्रतिक्रिया दिल्या आहेत ज्या बघून मजा येईल. भारतात तर लोक अनेकदा मूड चांगला करण्यासाठी देखील याचं सेवन करतात. पण जपानमधील लोकांनी जेव्हा पहिल्यांदाच हाजमोलाची टेस्ट घेतली तेव्हा त्यांच्या 'जोर का झटका धीरेसे' लागला असंच म्हणावं लागेल.
रील इन्स्टाग्रामवर शेअर इन्फ्लुएन्सर @koki_shishido ने कॅप्शनमध्ये लिहिलं की, भारत बिगनर्ससाठी नाही. जपानी लोकांनी पहिल्यांदा हाजमोला खाल्लं. या रीलला आतापर्यंत ६ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत आणि ३२ हजारांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. तर लोक या व्हिडिओवर वेगवेगळ्या गमतीदार प्रतिक्रियाही देत आहेत. एका यूजरने लिहिलं की, कोथिंबीरीची चटणी आणि चपातीही ट्राय करा. दुसऱ्याने लिहिलं की, एकदा चिंच सुद्धा खाऊन बघा. तर तिसऱ्याने लिहिलं की, तोंडाला पाणी सुटलं.