अंग गोठवणाऱ्या थंडीत बर्फाचा केक तयार केला; अन् जवानाचा वाढदिवस साजरा झाला; पाहा व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2020 04:53 PM2020-06-29T16:53:36+5:302020-06-29T17:01:57+5:30
हृदयाला भिडणारं असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे.
सोशल मीडियावर सध्या भारतमातेच्या संरक्षणासाठी दिवसरात्र लढत असणाऱ्या जवानांचा व्हिडीओ व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून सोशल मीडिया युजर्स भावूक झाले आहेत. आयपीएस अधिकारी पंकज नैन यांनी हा जवानांचा व्हिडीओ आज ट्वीटरवर शेअर केला आहे. हृदयाला भिडणारं असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे.
या व्हिडीओला आत्तापर्यंत ५ हजारांपेक्षा जास्त व्हिव्हज् आणि १ हजारांपेक्षा लाईक्स मिळाले आहेत. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता चार जवान एकत्र मिळून आपल्या मित्राचा वाढदिवस साजरा करत आहेत. आजूबाजूला असलेल्या बर्फाचा केक तयार केला आहे.
दबा हर इच्छा दिल में , हर फिक्र धुंए में उड़ाते है।
— Pankaj Nain IPS (@ipspankajnain) June 29, 2020
मनती रहे आपकी हर सालगिरह सकून से, बस इसी की खातिर..
इस भारत माँ के कुछ बेटों के हर खास दिन , सरहदों पे ही निकल जाते है।।#Respect#Salute#Uniformpic.twitter.com/mgACse85kB
या केकवर मोठ्या अक्षरात बाबू असे नाव लिहिले आहे. एका जवानाने केक कापल्यानंतर त्यांचे मित्र बर्फाचा तुकडा केकप्रमाणे उचलून आपल्या मित्राच्या तोंडाला लावत आहे. हार्टशेपचा हा केक आहे. यासोबतच हे जवान हॅप्पी बर्थडेचं गाणं सुद्धा म्हणत आहेत. मित्राला आनंद देण्यासाठी कोणतेही साहित्य उपलब्ध नसताना सैनिक मित्रांनी शक्कल लढवून बर्फाचा केक तयार केला आहे. केक कापण्यासाठी सुरी ऐवजी लांबच लांब काठीचा वापर जवानांनी केला आहे.
जवानांना कधीही कोणताही सण किंवा आपला वाढदिवस मनमोकळेपणाने साजरा करता येत नाही. आपल्या कुटुंबाला भेटता येत नाही. संपूर्ण देशाला रोज आपले वाढदिवस किंवा सण उत्सव शांतनेने साजरे करता यावेत यासाठी सैनिक आपल्या जीवाची बाजी लावून लढत असतात. त्यामुळे हा व्हिडीओ पाहून अनेकांच्या डोळ्यात अश्रू आले आहेत. अंग गोठवणाऱ्या थंडीत, आहे त्या स्थितीत जवान आपला आनंद साजरा करत आहेत. १३ सेकंदांच्या या व्हिडीओने अनेकांचे डोळे पाणावले आहेत.
गोळी लागल्यानंतरही साधी बीडी सोडत नाही; अन् चीनला वाटतंय आम्ही जमीन सोडू...
क्या बात! वैज्ञानिकांना पृथ्वीखाली सापडलं 600 मैल मोठं लपलेलं स्ट्रक्चर, काय काय होणार उलगडा?