जवानांच्या शौर्याला सलाम; कमरेपर्यंत शरीर अडकलं बर्फात, तरीही खंड पडेना कर्तव्यात!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2022 12:24 PM2022-12-28T12:24:57+5:302022-12-28T12:25:06+5:30

भारतीय जवान या बर्फातही आपली सेवा बजावत आहेत. भारतीय जवानांचा सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

jawan can be seen walking through snow with a smile on his face indian army | जवानांच्या शौर्याला सलाम; कमरेपर्यंत शरीर अडकलं बर्फात, तरीही खंड पडेना कर्तव्यात!

जवानांच्या शौर्याला सलाम; कमरेपर्यंत शरीर अडकलं बर्फात, तरीही खंड पडेना कर्तव्यात!

Next

देशात मोठ्या प्रमाणात थंडी पडली आहे. दिल्ली, उत्तराकंडसह देशभरात तापमानाचा पारा घसरला आहे. जम्मू काश्मिरसह उत्तराखंडमध्ये माठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होत आहे, भारतीय जवान या बर्फातही आपली सेवा बजावत आहेत. भारतीय जवानांचा सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत भारतीय जवान कमरेपर्यंत बर्फातही आपली सेवा मोठ्या जोशात बजावत असल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

या व्हिडीओमध्ये लष्कराचा एक जवान कंबरभर बर्फात सीमेवर गस्त घालताना दिसत आहे.हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देत जवानांना सलाम केले आहे.  

२२ वर्षीय युट्यूबर लीना नागवंशीची आत्महत्या; सोशल मीडियावर होते १० हजारपेक्षा जास्त फॉलोअर्स

एकीकडे वाढत्या थंडीत बर्फ पडायला सुरुवात झाली आहे. व्हिडीओमध्ये लष्कराचे जवान पर्वतांवर पडलेल्या बर्फाच्या दाट चादरमध्ये सीमेवर गस्त घालताना दिसत आहेत. लष्कराचे जवान कंबरभर बर्फात फिरताना दिसत आहेत. यादरम्यान त्याच्या चेहऱ्यावरचे हास्य आणि उत्साहाने भरलेली त्याची मेहनत पाहून तुम्हीही त्याचे फॅन व्हाल.

हा व्हिडिओ ट्विटरवर @SoldierNationF1 नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हृदय जिंकणाऱ्या या व्हिडिओला आतापर्यंत एक लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, तर आठ हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाईक केले आहे. नेटकरी भारतीय लष्कराच्या या साहस आणि साहसाला सलाम करत आहेत.

Web Title: jawan can be seen walking through snow with a smile on his face indian army

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.