जेसीबी ड्रायव्हरला संताप अनावर, बीचवर शांतपणे झोपलेल्या मुलासोबत असं केलं असं काही की...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2021 01:50 PM2021-09-08T13:50:09+5:302021-09-08T13:51:41+5:30
अभिनेत्री सनी लिओनी हिने जेसीबीसोबत फोटो टाकला आणि नंतर सोशल मीडियावर या ट्रेंडशा संबंधित पोस्टचा प्रचंड भडीमार पाहायला मिळाला. लोक खूप भन्नाट व्हिडीओ आणि मिम्स शेअर करत होते.आता जेसीबीचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.
‘जेसीबी की खुदाई’ हा ट्रेंड आपल्याला माहिती आहे. अभिनेत्री सनी लिओनी हिने जेसीबीसोबत फोटो टाकला आणि नंतर सोशल मीडियावर या ट्रेंडशा संबंधित पोस्टचा प्रचंड भडीमार पाहायला मिळाला. लोक खूप भन्नाट व्हिडीओ आणि मिम्स शेअर करत होते.आता जेसीबीचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.
जेसीबीच्या व्हायरल होणाऱ्या नव्या व्हिडीओत एक तरुण बीचवर मस्तपैकी झोपला आहे. त्याला कदाचित जेसीबी चालकाने तिथून उठायला सांगितलं असावं. पण तो उठला नाही. त्यामुळे रागावलेल्या जेसीबी चालकाने समुद्राचं पाणी जेसीबीत भरुन त्याच्या अंगावर टाकलं. यावेळी तरुणाची चांगलीच भंबेरी उडाली. नेमकं काय झालंय ते त्याला समजलंच नाही. तो तातडीने तिथून उठला आणि त्याने तिथुन पळ काढला.
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर hepgul5 या अकाउंटवरुन शेअर करण्यात आलं आहे. हा व्हिडीओ अपलोड झाल्यानंतर अवघ्या काही क्षणात १ हजार ६०० लोकांनी तो लाईक केला. तसेच काही युजर्सनी या व्हिडीओवर भन्नाट प्रतिक्रियाही दिल्या आहेत. पण अनेकांनी इमोजी टाकत आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. यापैकी एका युजरने लहानपणाची आठवण आल्याचं म्हटलंय.