जेएनयुच्या सिक्युरीटी गार्डने 'या' गाण्यावर धरला ठेका, अन् सर्व विद्यार्थी वाजवू लागले टाळ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2021 04:10 PM2021-12-10T16:10:06+5:302021-12-10T16:12:59+5:30
नुकताच एका सुरक्षा रक्षकाचा व्हिडीओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जो पाहून तुम्हीही क्षणांत वाह-वाह म्हणाल…!
सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांना त्यांच्या गायन आणि नृत्य कौशल्याच्या जोरावर नवी ओळख मिळाली आहे. त्याचवेळी सोशल मीडियावर असाच काही व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये खरी प्रतिभा स्पष्टपणे दिसत आहे. नुकताच एका सुरक्षा रक्षकाचा व्हिडीओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जो पाहून तुम्हीही क्षणांत वाह-वाह म्हणाल…!
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, सुरक्षा रक्षक ‘जुली’ या गाण्यावर नाचताना दिसत आहे. त्यांना पाहून तिथं हजर असलेले विद्यार्थीही जल्लोष करत आहेत. यानंतर सुरक्षा रक्षक न थांबता आपला डान्स सुरू ठेवतो. त्या व्यक्तीचे डान्स स्टेप्स पाहून तिथले विद्यार्थीच नव्हे तर सोशल मीडियावरचे लोकही भारावून गेले आहेत.
‘जेएनयू डान्स क्लब’नेच हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. ज्यासोबत त्यांनी कॅप्शन लिहिले, ‘कलाकाराची कला कधीच मरत नाही!!! बातमी लिहेपर्यंत या व्हिडीओला २५ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडिओवर अनेक युजर्सनी कमेंट करत प्रतिक्रिया दिल्या आहेत.
The Art of an artist never dies!!!!....
— JNU ROUND TABLE (@Jnuroundtable) December 7, 2021
Dance of JNU security guard ji🔥🔥.... #artist#JNU@JNU_Photos@ndtv@ScoopWhoop@TheLallantoppic.twitter.com/fUrrzYMCZl
एका यूजरने कमेंटमध्ये लिहिले, Amazing आणि दुसऱ्याने कमेंट केली, विश्वास बसत नाही. त्याचवेळी दुसर्या यूजरने लिहिले की, या व्यक्तीने डान्स फ्लोअरला आग लावली आहे. तुमच्या माहितीसाठी, 1987 मध्ये एक बॉलिवूड अॅक्शन फिल्म ‘जीते हैं शान से’ रिलीज झाली होती, त्यात मिथुन चक्रवर्ती, संजय दत्त आणि गोविंदा यांनी अभिनय केला होता. त्याच चित्रपटातील हे गाणं आहे.