बेरोजगारीला कंटाळून तरुणाने 'हे' काय केलं, 'सिग्नलवरच...'तरुणाची आयडिया व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2022 12:30 PM2022-11-10T12:30:03+5:302022-11-10T12:35:28+5:30

भारतातच नाही तर जगात लोक बेरोजगारीने त्रस्त आहेत. हाताला काम नाही, घर कसे चालणार, कर्ज कसे फेडणार असे प्रश्न त्यांच्यासमोर आहेत. दरम्यान एका तरुणाने त्याच्या कृतीने जगाचे लक्ष वेधले आहे

jobless-man-distribute-cv-and-chocolate-bar-at-marina-dubai-goes-viral | बेरोजगारीला कंटाळून तरुणाने 'हे' काय केलं, 'सिग्नलवरच...'तरुणाची आयडिया व्हायरल

बेरोजगारीला कंटाळून तरुणाने 'हे' काय केलं, 'सिग्नलवरच...'तरुणाची आयडिया व्हायरल

googlenewsNext

बेरोजगारीमुळे त्रस्त लोक काय करतील काही सांगता येत नाही.  भारतातच नाही तर जगात लोक बेरोजगारीने परेशान आहेत. हाताला काम नाही, घर कसे चालणार, कर्ज कसे फेडणार असे प्रश्न त्यांच्यासमोर आहेत. दरम्यान दुबईतील एका तरुणाने त्याच्या कृतीने जगाचे लक्ष वेधले आहे. नेमके काय केले त्याने असे ?

नोकरी मिळत नाही म्हणून तरुणाने लढवलेली शक्कल सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. हा तरुण दुबई मरिनाच्या ट्रॅफिक सिग्नलवर उभा राहून चक्क चॉकलेट बार सोबत आपल्या 'सीव्ही' (curriculum vitae) चे वाटप करतोय. सीव्ही सोबत चॉकलेट बार स्टेपल करुन तो सिग्नल वर उभा राहतोय. येणाऱ्या जाणाऱ्यांना तो याचे वाटप करताना दिसतोय. सोबतच त्याने एक चिठ्ठी सुद्धा लिहिली आहे की, ' तुम्ही जर मला नोकरी दिली तर मी कायम तुमचा ऋणी असेन. तुमचा दिवस आनंदी आणि शुभ जावो ही प्रार्थना.'

कोण आहे हा तरुण?

या तरुणाचे नवर मौखलाती आहे. त्याने सीव्हीमध्ये आपली सगळी माहिती दिली आहे. अल जरका विश्वविद्यालयमधून त्याचे शिक्षण झाले असून त्याला अरबी आणि इंग्रजी भाषा बोलता येतात. विविध कार्यालयात सेल्समनची नोकरी केल्याचा त्याच्याकडे अनुभव आहे. त्याने लिंक्डइन अकाऊंटवरही यासंबंधी माहिती दिली आहे. 

लिंक्डइनवर शुभेच्छा 
त्याने लिंक्डइनवर पोस्ट केले की, 'लिंक्डइनवरुन नोकरी न मिळाल्याने मी दुबईच्या सिग्नलवर उभे राहून सीव्हीचे वाटप सुरु केले.' त्याच्या या भन्नाट कल्पनेमुळे प्रभावित होऊन नेटकऱ्यांनीही त्याला शुभेच्छा दिल्या. 
 

Web Title: jobless-man-distribute-cv-and-chocolate-bar-at-marina-dubai-goes-viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dubaiदुबई