लग्नात बुट चोरण्यासाठी जुंपली मारामारी, एकमेकाला दे दणादण देत जमिनीवर कोसळले वऱ्हाडी..
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2021 08:46 PM2021-10-24T20:46:09+5:302021-10-24T20:46:18+5:30
बूट चोरल्यानंतर बुटांच्या बदल्यात शगून म्हणून पैशांची मागणी केली जाते. त्याचवेळी, लग्नात दाजींनाही आपले शूज वाचवायचे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात याच प्रथेवेळी वर आणि वधूपक्षाकडील वऱ्हाडी शूज मिळवण्यासाठी एकमेकांच्या अंगावर पडताहेत, अख्ख्या मांडवभर तांडव घालत आहेत.
लग्नाच्या वेळी एक विधी असतो जो प्रत्येक घरात केला जातो. त्याने बूट चोरण्याचा. हा विधी अतिशय विशेष मानला जातो. या विधीमध्ये मेव्हणी आपल्या दाजींचे बूट चोरण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. बूट चोरल्यानंतर बुटांच्या बदल्यात शगून म्हणून पैशांची मागणी केली जाते. त्याचवेळी, लग्नात दाजींनाही आपले शूज वाचवायचे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात याच प्रथेवेळी वर आणि वधूपक्षाकडील वऱ्हाडी शूज मिळवण्यासाठी एकमेकांच्या अंगावर पडताहेत, अख्ख्या मांडवभर तांडव घालत आहेत.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये बूट चोरीच्या वेळी दोन्ही पक्षांचं कुटुंब बुट हिसकावण्यासाठी एकमेकांशी भांडतात. शूज मिळवण्यासाठी सुमारे डझनभर लोकांनी एकमेकांशी भांडणे सुरू केली. एका बाजूला शूज चोरायचे आहेत आणि दुसऱ्या बाजूने शूज वाचवायचे आहे. या गडबडीत, काही लोक शूजसाठी जमिनीवर एकमेकांच्या अंगावरही पडतात. हेच नाही तर शूज मिळालेला वऱ्हाडी बागेत पळत आहे, आणि त्याच्यामागे इतर वऱ्हाडी लागले आहेत. या राड्यात एक -दोन जण जमिनीवरही पडले.
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. आपण सर्व विवाह सूत्र नावाच्या खात्यावर व्हिडिओ पाहू शकता. या व्हिडिओवर प्रत्येकजण आपापल्या लाईक्स आणि कमेंट्सद्वारे भरभरून प्रेमाचा वर्षाव करत आहे. हा व्हिडिओ शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले, ‘जे वराच्या वतीने शूजसाठी लढतील त्यांना टॅग करा.’ इतर अनेक युजर्सनीही या व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया दिल्या. याशिवाय इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही हा व्हिडिओ पाहायला मिळत आहे.