कच्चा बादाम गाणाऱ्या भुबन यांच्या शेजाऱ्यांना सतावतेय वेगळीच भीती; गायकानं घेतला मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2022 03:52 PM2022-02-22T15:52:24+5:302022-02-22T15:53:47+5:30

कच्चा बादाम गाण्यानं भुबन प्रसिद्धीच्या झोतात; एका गाण्यामुळे रातोरात स्टार

Kacha Badam singer Bhuban Badyakar doesn’t sell peanuts anymore | कच्चा बादाम गाणाऱ्या भुबन यांच्या शेजाऱ्यांना सतावतेय वेगळीच भीती; गायकानं घेतला मोठा निर्णय

कच्चा बादाम गाणाऱ्या भुबन यांच्या शेजाऱ्यांना सतावतेय वेगळीच भीती; गायकानं घेतला मोठा निर्णय

Next

सोशल मीडियामुळे अनेकांचं नशीब पालटलं. व्हायरल व्हिडीओंमुळे काही जण गरिबीतून वर आले. काहींनी मदतीचा हात मिळाला. तर काहींना रातोरात स्टारडम मिळालं. रानू मंडलपासून डब्बू अंकलपर्यंत अनेकांना सोशल मीडियानं घराघरात पोहोचवलं. आता याच यादीत कच्चा बदाम गाणाऱ्या भुबन बडायकर यांचा समावेश झाला आहे. बीरभूममधल्या सुंदर गावात सायकलवरून भुईमूग विकणाऱ्या भुबन यांना एका गाण्यानं तुफान लोकप्रिय केलं. त्यानंतर त्यांनी कोलकात्यातल्या एका नाईट क्लबमध्ये गाणंदेखील सादर केलं. एका गाण्यानं भुबन यांना सेलिब्रिटी बनवलं.

भुबन बडायकर यांचा प्रवास स्वप्नवत ठरला आहे. मी इथे तुमच्यामध्ये येऊन खूप आनंदित असल्याचं भुबन यांनी कोलकात्यातल्या एका पॉश नाईट क्लबमध्ये उपस्थितांशी संवाद साधताना म्हटलं. यावेळी भुबन यांनी एक लखलखणारं जॅकेट परिधान केलं होतं. यावेळी भुबन यांनी त्यांचं व्हायरल झालेलं कच्चा बादाम गाण गायलं.

कधीकाळी कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणं भुबन यांच्यासाठी अवघड होतं. दिवसरात्र भुईमूग विकून ते कसाबसा चरितार्थ चालवायचे. मात्र कच्चा बादाम व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर ऑफर्सचा पाऊस पडला आहे. गेल्याच आठवड्यात एका म्युझिक कंपनीनं भुबन यांना त्यांच्या अपकमिंग ट्यूनसाठी रॉयल्टी म्हणून दीड लाख रुपये दिले.

लोकांनी दिलेल्या प्रेमाबद्दल आपण त्यांचे ऋणी असल्याचं भुबन यांनी सांगितलं. आता भुईमूग विक्री करणं बंद केल्याची माहिती त्यांनी दिली. 'मला मिळालेल्या प्रसिद्धीची माहिती गावापर्यंत पोहोचल्यानंतर शेजाऱ्यांनी मला भूईमूग विकण्यासाठी जाऊ नको असं सांगितलं. कोणीतरी तुझं अपहरण करेल, असं त्यांना वाटतं,' असं भुबन म्हणाले.

Web Title: Kacha Badam singer Bhuban Badyakar doesn’t sell peanuts anymore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.